
नागपूर दि.८ एप्रिल...अखिल भारतीय साहित्य परिषद विदर्भ प्रांताची वर्ष २०२३-२४ साठीची कार्यकारणी नुकतीच गठित करण्यात आली आहे. विदर्भ प्रांत अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक एड. लखनसिंह कटरे यांची फेरनिवड करण्यात आली असून कार्याध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक अविनाश पाठक तर विदर्भ प्रांत महामंत्री म्हणून ज्येष्ठ विधीज्ञ आणि कवी ऍड सचिन नारळे यांना निवडण्यात आले आहे.
ऍड लखनसिंहजी कटरे हे शासकीय अधिकारी म्हणून निवृत्त झाले असून साहित्य क्षेत्रात देखील त्यांची लक्षणीय कामगिरी राहिली आहे. नुकतीच त्यांची साहित्य अकादमीचा मराठी भाषा सल्लागार समितीचे सदस्य म्हणूनही नियुक्ती करण्यात आली आहे. अखिल भारतीय पोवारी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद देखील त्यांनी भूषविले आहे.
कार्याध्यक्षपदी निवड झालेले अविनाश पाठक गत पाच दशकांपासून पत्रकारितेत कार्यरत असून साहित्यिक आणि सामाजिक क्षेत्रातही त्यांची उल्लेखनीय कामगिरी राहिली आहे. महामंत्री म्हणून निवड झालेले ऍड सचिन नारळे हे उच्च न्यायालयात विधीज्ञ म्हणून कार्यरत असून त्यांनी वृत्तपत्रीय लेखन देखील विपूल केले आहे. अथांग या नावाने त्यांनी रचलेल्या कविताही गाजलेल्या आहेत..
कार्यकारिणीतील इतर पदाधिकारी असे आहेत..
उपाध्यक्ष : डॉ सौ. अमृता इंदुरकर
कोषाध्यक्ष श्री महेश आंबोकर
सहसंघटन मंत्री : डॉ सौ प्रगती वाघमारे
कार्यकारिणी सदस्य :
श्रीमती दीप्ती कुशवाह
श्री धनंजय ढोक
श्री राजा धर्माधिकारी
श्रीमती मंजुषा कानडे
जिल्हा समन्वयक
नागपूर.. डॉ स्वाती मोहरीर
भंडारा… सौ. अर्चना गुर्वे
वर्धा.. ऍड अनंत साळवे
चंद्रपूर..प्रा जयश्री शास्त्री
अमरावती.. श्री विष्णू सोळंके
अकोला.. सौ मोहिनी मोडक
बुलढाणा.. श्री अंबरिष पुंडलिक
वाशिम.. श्री आशिष तांबोळकर
गडचिरोली.. प्रा श्रीराम गहाणे
गोंदिया.. श्री. गोवर्धन बिसेन
यवतमाळ.. श्री देवेंद्र जोशी.
विशेष निमंत्रित (सल्लागार समिती )
श्री प्रकाश एदलाबादकर
डॉ छाया नाईक
पद्मश्री नामदेव कांबळे
पद्मश्री परशुराम खुणे
श्री लक्ष्मणराव जोशी…
अ.भा. साहित्य परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रवीण दवणे आणि कार्याध्यक्ष डॉ नरेंद्र पाठक यांनी नवीन कार्यकारिणीचे अभिनंदन केले असून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत…




