
भंडारा : काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार गोपालदास अग्रवाल यांच्यावर गोंदिया येथे आयोजित पत्रपरिषद दरम्यान प्राणघातक हल्ला करण्यात आला. त्या हल्ल्याच्या निषेधार्थ भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनेसोमवारला रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
तत्पुर्वी त्रिमूर्ती चौक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेस पक्षाच्या वतीने गोपालदास अग्रवाल यांच्यावरील हल्ल्याचा निषेध म्हणून जिल्हाध्यक्षजिया पटेल, जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिरलोरकर, मधुकर लिचडे, आशिष पात्रे, प्रेमसागर गणवीर, प्रसन्न चकोले, राजकपूर राऊत, सचिन घनमारे, अजय गडकरी, शिशिर वंजारी यांच्या संयुक्त नेतृत्वात निदर्शने करण्यात आले.
आंदोलनकर्त्यांनी राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम केल्याने काही वेळ वाहतूक खोळंबली होती. दरम्यान राज्यशासनाच्या लोकशाही विरोधी कृत्याच्या विरोधात आंदोलनकर्ते घोषणा देत होते.
घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करून शिव शर्मा याचा स्विकृत सदस्यपद रद्द करावा, अशा मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात आले. याप्रसंगी जि.प. सदस्य प्रेमदास वनवे, निलकंठ (बालु) कायते, प्यारेलाल वाघमारे, चुन्नीलाल वासनिक, रेखा वासनिक, सुरेश गोन्नाडे, विनीत देशपांडे, इमरान पटेल, यशपाल कामठे, चैनलाल मस्के, अशोक बन्सोड, रोहित धकाते, भुपेंद्र इलमे, चेतन सेलोकर, नारायण मेश्राम, अयुब पटेल, सिताराम कापगते, विवेक भोयर, राजकपूर सरादे, अजय तांबे, रोहित दुर्गे, प्रदीप डोंगरे, श्रीराम अटराये, अमित उके, सुशील नगराळे, अजय तांबे, रूपलता जांभुळकर, गोविंद मेघराजानी, मोहन उके, मनोज टहिल्यानी, प्रदीप तितीरमारे, माधवराव भोयर, हमीम अकबानी, नरेश बेलेकर, भारती लिमजे, भावना शेंडे, कविता चाचेरे, चांगुणा करवाडे, ममता करवाडे, रत्नमाला मेश्राम, उपासना शेंडे, इंदू गणवीर, सुनिता खंडाते, सुनिता रोकडे, देवका मेश्राम, अनुसया नेवारे, अनिल निर्वाण, सुरेश निर्वाण, मुकूंद साखरकर, वरगंटीवार, सचिन फाले, बोरकर यांच्यासह शेकडो व कार्यकर्ते उपस्थित होते





