
#आमगाव बाजार समिती निवडणुकीत सत्तेच्या बाजारीकरणावर पायबंद घालण्यासाठी शेतकऱ्यांनी उभारले परिवर्तनाची पैनल
# सर्व उमेदवार निवडणूक जिंकणार
#राष्ट्रवादी हुकूमशाहची युती अभद्र असल्याचा दावा
आमगाव:- आमगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक संदर्भात रणशिंग बांधून शेतकऱ्यांनी किसान विकास परिवर्तन पैनल तयार करून उमेदवार उभे करून राष्ट्रवादी व भाजप या गट विरुद्ध आव्हान उभे केले आहे.याविषयी किसान विकास परिवर्तन पैनल ने पत्रपरिषद घेऊन तीस वर्षांचा कालावधी व एक हाती सत्तेचा हुकूमशाहची सत्तेने बाजार समितीचे वाटोळे कसे झाले याचा पाढाच समोर केले.
केंद्र व राज्य सरकारने शेतकरी यांच्या हितासाठी योजनांच्या माध्यमातून शेतकरी यांना विकासाकडे घेऊन जाण्याचा मार्ग निर्माण करून दिले,यात गोंदिया जिल्ह्यातील आमगाव कृषी उत्पन्न बाजार समिती येथील आर्थिक उलाढाल कोट्यवधींची आहे.परंतु या आर्थिक उलाढाल असताना मात्र शेतकऱ्याचे आर्थिक मदत व बाजार समितीचे विकास मात्र बाजार समितीत काही वेक्तींनी पायदळी पडले आहे. स्वार्थ साधून यांच्या शेतकऱ्यांच्या टाळूवरील लोणी खाणारे काही नेत्यांनी बाजार समितीचा विकास केला नाही.शेतकरी संकटात मदत नाही,शेतकऱ्यांना त्यांचे धान्य पुंजने ,पशु चारा व गोठे जळीत परिस्थितीत त्यांच्या मदतीला धावून जाण्याचे समर्थ कधी माजी पदाधिकारी व संचालकांनी दाखवले नाही.बाजार समितीत येणाऱ्या शेतकरी आडतीया व मजूर यांच्या हिताचे कार्य शून्य आहे.त्यांना आरोग्य तपासणी,विमा यासह शिवभोजन तर शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यास माजी पदाधिकारी व संचालकांना देता आले नाही.ग्रामीण भागातून येणाऱ्या शेतकरी धान्य विक्री साठी बाजार समितीत अनेकदा रात्रीकाळात अंधारात उघड्यावर रात्र काढतो पण त्याला साधे विश्राम गृहाची सोय उपलब्ध करता आले नाही.आधुनिक शेतीसाठी शेतकऱ्यांना धान्य पीक ,भाजीपाला व इतर पीक घेण्यासाठी कधी प्रशिक्षणासाठी मार्गदर्शन करता आले नाही ,शेती प्रशिक्षण,बाजारपेठ,
आंतरराष्ट्रीय निर्यात ,व्यावसायिक मार्गदर्शन इतक्या वर्षात कधी झाले याचे चिंतन करण्याची वेळ आली आहे. बाजार समिती शेतकऱ्यांची पण स्वार्थी नेत्यांमुळे मात्र शेतकरीच या ठिकाणी बळी ठरला आहे.योजनांचा लाभ मात्र काही व्यापारी नेत्यांनी उचलून स्वताच्या घश्यात घातले आहे.यामुळे शेतकरी पुत्राना रोजगारापासून वंचित व्हावे लागले.
मागील तीस वर्षांपासून बाजार समितीच्या माजी पदाधिकारी व संचालकांनी हुकूमशाहची सत्ता गाजवली आहे यात मात्र बळी ठरला मात्र शेतकरी!.सामान्य शेतकऱ्यांना डावलून काही व्यापारी नेत्यांनी आपली हुकूमशाहची सत्ता काबीज करण्यासाठी पुन्हा अभद्र युती करून सामान्य शेतकरी यांना यात उमेदवारी दिली नाही. यामुळे सामान्य ग्रामीण शेतकऱ्यांनी बाजार समितीत परिवर्तन घडवून आणण्यासाठी किसान परिवर्तन पैनल तयार करून लढा उभारला आहे.शेतकरी जनतेसाठी यात शंभर टक्के यश हा किसान परिवर्तन पैनलला मिळेल असा विश्वास ग्रामीण शेतकऱ्यांनी दिला आहे.शेतकऱ्यांच्या विकासासाठी आमचे लढा देत आहो नक्की यात यश मिळेल असा विश्वास त्यांनी वेक्त केला.यावेळी पत्र परिषदेत किसान विकास परिवर्तन पैनलचे जेष्ठ कार्यकर्ते सेवकराम ब्राह्मणकर, बंशिधर अग्रवाल,यशवंत मानकर,संजय बहेकार,गुडडा गहरवार, संभूदयाल अग्रीका,मेघश्याम मेंढे,इसुलाल भालेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.





