34.3 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home Top News राज्य पोलीस दलात मोठे फेरबदल;32 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

राज्य पोलीस दलात मोठे फेरबदल;32 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

0
30

blank

मुंबई:-राज्यातील गृह विभागात आज मोठे फेरबदल करण्यात झाले आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आज बदल्या करण्यात आल्या आहेत.गृह विभागात 32 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.सदानंद दाते यांची दहशतवाद विरोधी पथकाचा पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर संजय दराडे यांच्यावर पुणे विभागच्या विशेष पोलीस महानिरीक्षक गुन्हे अन्वेषणची जबाबदारी देण्यात आली आहे.

अनिल कुंभारे यांच्यावर विशेष पोलीस महानिरीक्षक दहशतवाद विरोधी पथकाची जबाबदारी असणार आहे. दिलीप सावंत यांच्यावर विशेष पोलीस महानिरीक्षक सागरी सुरक्षेची जबाबदारी असणार आहे. ज्ञानेश्वर चव्हाण यांची विशेष पोलीस महानिरीक्षक छत्रपती संभाजी नगर परिषद बदली करण्यात आली आहे.

एस एन पुरे यांच्यावर विशेष पोलीस महानिरीक्षक, गुन्ह्यांविषयी विभाग पुणे येथील जबाबदारी असणार आहे. डॉ. मनोज लोहिया यांची छत्रपती संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. पंजाबराव उगले यांची अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे, ठाणे विभाग येथे नियुक्ती करण्यात आली आहे.

डॉ. अभिनव देशमुख यांच्यावर दक्षिण मुंबई अप्पर पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. अनिल पारस्कर यांची अप्पर पोलीस आयुक्त मध्य प्रादेशिक विभाग पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

एम रामकुमार यांची अप्पर पोलीस आयुक्त वाहतूक विभाग पदी नियुक्ती करण्यात आली आहे. शशीकुमार मीना यांची अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे विभाग मुंबई पदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रवीण पाटील यांची अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे पदी नियुक्ती झाली आहे.

blank