42.4 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home विदर्भ दासगाँव, काटी, कामठा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन ईमारतीसाठी २० कोटी मंजूर...

दासगाँव, काटी, कामठा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन ईमारतीसाठी २० कोटी मंजूर  

0
21

blank

#तर मोरवाही, कामठा येथे आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीचेही होणार बांधकाम

गोंदिया- तालुक्यातील दासगाव, काटी आणि कामठा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र करीता नविन इमारतीसाठी २० कोटी मंजूर झालेले आहे. लवकरच सदर इमारतीचे बांधकाम प्रक्रिया सुरु होणार आहे. याशिवाय मोरवाही अणि कामठा येथे आरोग्य उपकेंद्र इमारतीसाठी सुद्धा निधि मंजूर झाले आहे. गावखेड्यात सर्वाधिक आरोग्य विषयी समस्यासाठी उपयोजना निर्माण करून नागरिकांना गावातच योग्य अणि गुणवत्ता पूर्ण सेवा प्राप्त व्हावे या उद्देशाने सदर कामांना प्राधान्य देवून मान्यता प्रदान करून निधि उपलब्ध करण्यासाठी आमदार विनोद अग्रवाल यांनी प्रयत्न केले.

स्थानिक जिल्हा परिषद् सदस्य यांनी आमदार विनोद अग्रवाल यांना त्यांच्या परिसरात होणार्या गैरसोयीबाबत कळविले असता आरोग्य विषयक कामांना प्राधान्य देण्याची मागणी केली गेली होती. त्या मागणीच्या आधारावर एकूण २० कोटी रुपयाचे कामासाठी निधि मंजूर करण्यात आमदार विनोद अग्रवाल यांना यश मिळाले आहे. या कामासाठी जिल्हा परिषद् सदस्य, पंचायत समिति सदस्य अणि ग्राम पंचायत सरपंच यांनी आमदार विनोद अग्रवाल यांचे आभार व्यक्त केले आहे.

blank