40.6 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home विदर्भ मुंडीपार येथे सिमेंट रस्ता बांधकामाचे जि.प.सदस्यांच्या हस्ते भूमिपूजन

मुंडीपार येथे सिमेंट रस्ता बांधकामाचे जि.प.सदस्यांच्या हस्ते भूमिपूजन

0
40

blank

गोरेगांव:-तालुक्यातील मुंडीपार येथील आखरटोली स्थित असलेल्या आत्माराम भावे यांच्याघरापासुन ते दुलीचंद शिवणकर यांच्या घरापर्यंत सिमेंट कांक्रेट रस्त्याचे भूमिपूजन जि.प.सदस्य डॉ. लक्ष्मण भगत यांच्या हस्ते करण्यात आले.जि.प.सदस्य यांच्या स्थानिक विकास निधीतून हे बांधकाम मंजूर करण्यात आले आहे.भूमिपूजन कार्यक्रमाला सरपंच सौ.प्रेमलता राऊत,ग्रामसेवक अरविंद साखरे, माजी उपसरपंच तथा वर्तमान ग्रा.पं. सदस्य जावेद( राजाभाई) खान,माजी उपसरपंच तथा वर्तमान ग्रा.पं.सदस्य चंद्रशेखर शहारे,माजी सरपंच सुमेंद्र धमगाये,तंमुस अध्यक्ष गिरिश पारधी,तंमुस सदस्य ज्ञानेश्वर राऊत,आत्माराम भावे,नरेश राऊत,ग्रा.पं.लिपीक सुनिल वाघाडे,राहुल राऊत,ग्रा.पं.सदस्य आम्रपाली राऊत,भुमेश्वरी पारधी,सरिता सुरजोसे, संगीता सरजारे,ग्रामपंचायत कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

blank