
नागपूर,दि.23ः-ओबीसी समाजावर होत असलेल्या सर्वव्यापी हल्ल्यांबाबत माहिती देण्याकरीता तसेच ओबीसीची जातनिहाय जनगणना, ओबीसी विद्यार्थ्यांना वसतिगृह, महाज्योती संस्था,महात्मा ज्योतिबा फुले स्थापित सत्यशोधक समाजाच्या 150 व्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष निमित्त, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज, मंडल मसिहा माजी पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग यांच्या संयुक्त जयंती निमित्त एक दिवशीय संवाद परिषदेचेे (शिबिर) आयोजन रविवार दिनांक 25 जून सकाळी दहा वाजता सेवा दल महिला महाविद्यालय सक्करदरा नागपूर येथे आयोजित करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष कृष्णाजी बेले ज्येष्ठ नेते तथा राज्य संघटक विदर्भ तेली समाज महासंघ .स्वागताध्यक्ष संजय शेंडे अध्यक्ष सेवा दल शिक्षण संस्था नागपूर. उद्घाटक एस एल अक्कीसागर अध्यक्ष राष्ट्रीय एम्प्लॉईज फेडरेशन.महादेव जानकर,राष्ट्रीय अध्यक्ष रासप. हे राहतील, तर सामाजिक क्रांती शिवाय राजकीय परिवर्तन अशक्य यासंदर्भामध्ये ज्येष्ठ प्रबोधनकार सत्यशोधक अरविंद माळी महात्मा फुले सत्यशोधक विद्यापीठ यवतमाळ मार्गदर्शन करणार आहेत. दुसऱ्या सत्रामध्ये ओबीसीच्या बहुजनांच्या सर्वांगीण विकासाकरता आमच्या चळवळीची भूमिका ,आणि मराठ्यांचे ओबीसीकरण शासनाचा डाव ओबीसी समोरील आव्हान , याच कार्यक्रमात ओबीसी जागृतीकरीता लढा निधी महादेव जानकर यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त दिल्या जाणार आहे.गोपाल भारती अध्यक्ष संयुक्त मोर्चा,डॉ.ज्ञानेश्वर गोरे अध्यक्ष भारतीय पीछडा (ओबीसी )शोषित संघटन महाराष्ट्र .प्रदेश उपाध्यक्ष ओबीसी जन मोर्चा ,प्रा.सुशीलाताई मोराळे ,माजी खासदार डॉ. खुशाल बोपचे,उमेश कोराम विद्यार्थी नेते ,ज्ञानेश्वर माऊली सलगर ,प्राध्यापक जावेद पाशा अध्यक्ष मुस्लिम परिषद, अनिल कुमार राष्ट्रीय उपाध्यक्ष ,अ इंजिनीयर मोहम्मद हमीद चंद्र एमडीपी, मिस्टर अफजल जे अँड के .शुभांगी घाटोळे (मेश्राम) महिला आघाडी. सुनीता काळे विदर्भ अध्यक्ष ,हरिकिशन दादा हटवार, प्राध्यापक राहुल मुन,अरुण गाडे ,संजय रामटेके, हाजी शोहेब ,तौफिक पटेल हे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे आयोजक राष्ट्रीय संयुक्त मोर्चा भारत ,भारतीय पीछडा (ओबीसी )शोषित संघटन, ओबीसी जन मोर्चा ,संविधान परिवार ,विदर्भ तेली समाज महासंघ, समाज क्रांतीपरिवार ,महाराष्ट्र कास्ट्राईब संघटना व ओबीसी वादी इतरही संघटना यानी ओबीसी समाजबांधवाना उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केलेले आहे.




