33.9 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ महसूल सप्ताहनिमित्त एनएमडी कॉलेजमध्ये ‘युवा संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन

महसूल सप्ताहनिमित्त एनएमडी कॉलेजमध्ये ‘युवा संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन

0
22

blank

गोंदिया, दि.2 : कालपासून राज्यभर सुरू झालेल्या महसूल सप्ताहानिमीत्त जिल्ह्यातही विविध उपक्रम सुरू आहेतत्यामध्ये 2 ऑगस्ट रोजी युवा संवाद कार्यक्रमांतर्गत एनएमडी कॉलेज गोंदिया येथे उपविभागीय अधिकारी पर्वणी पाटील, तहसिलदार समशेर पठाण, अपर तहसिलदार विशाल सोनवने यांनी विद्यार्थ्यांना लागणाऱ्या विविध दाखल्यांची विस्तृतपणे माहिती दिली. यावेळी कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना लागणाऱ्या कागदपत्रांसाठी अर्ज भरुन घेण्यासाठी शिबीर आयोजित करण्यात आलेला आहे. गोंदिया तालुक्यात युवा संवाद कार्यक्रमांतर्गत एनएमडी कॉलेज व मनोहर मुन्सीपल हायस्कुल गोंदिया येथे शिबीर आयोजित करण्यात आला असून विद्यार्थ्यांना शिक्षण व नोकरीसाठी लागणारे विविध प्रमाणपत्र काढण्यासाठी प्रशासनामार्फत आवाहन करण्यात येत आहे. कार्यक्रमास एनएमडी कॉलेजच्या प्राचार्या शारदा महाजन यांच्यासह प्राध्यापक वर्ग उपस्थित होते.

        विद्यार्थ्यांना लागणारे विविध प्रमाणपत्रामध्ये आधार कार्ड दुरुस्ती– अलिकडे आपले नाव किंवा मोबाईल नंबर बदलला आहे का ? तुमच्या मुलाला अलिकडेच 5 किंवा 15 वर्ष झाले का ? आपण जवळच्या नामांकन/ अद्ययावत  केंद्रावर आपला आधार तपशिल (डेमोग्राफिक आणि बायोमेट्रिक्स) दुरुस्त/ अद्ययावत करु शकता. आधारमध्ये पत्ता अपडेट करा– आपण एका नव्या शहरात गेला आहात का ? किंवा अलिकडे आपला पत्ता बदलला आहे का ? आपल्या नविन पत्त्यावर आपला नविन पत्ता अपडेट करण्यास विसरु नका. आपल्याकडे वैध पत्ता पुरावा आहे किंवा पत्ता प्रमाणिकरण पत्र प्राप्त झाले आहे (ज्याच्याकडे वैध पत्त्याचा पुरावा नसल्यास), आपण आपला पत्ता अद्ययावत करु शकता.

        विविध दाखल्यांसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे. उत्पन्न दाखला– तलाठी उत्पन्न अहवाल, रेशनकार्ड, आधारकार्ड. अधिवास प्रमाणपत्र– शाळा सोडल्याचा दाखला, आधारकार्ड, रेशनकार्ड. नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र– तहसिलदारांचा 3 वर्ष उत्पन्न दाखला, आधारकार्ड, रेशनकार्ड, शाळेचा दाखला, जातीचा दाखला. जातीचा दाखला– विद्यार्थ्याचा शाळेचा दाखला, वडिलाचा शाळेचा दाखला, आजोबाचा शाळेचा दाखला, आधारकार्ड, रेशनकार्ड, स्वयंघोषणापत्र. आर्थिक दुर्बल (E.W.S.)- विद्यार्थ्याचा शाळेचा दाखला, वडिलाचा शाळेचा दाखला, मंडळ अधिकारी चौकशी अहवाल, आधारकार्ड, रेशनकार्ड, प्रतिज्ञापत्र. सेंट्रल ओ.बी.सी. दाखला– तहसिलदारांचे 3 वर्ष उत्पन्न दाखला, आधारकार्ड, रेशनकार्ड, शाळेचा दाखला, जातीचा दाखला, नॉनक्रिमीलेअर. अधिक माहितीसाठी संबंधित तहसिल कार्यालय अथवा महा ई-सेवा केंद्र येथे संपर्क साधावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी गोंदिया मार्फत करण्यात आले आहे.

blank