35.9 C
Gondiā
Saturday, June 13, 2026
Home Top News ‘मेरी माटी मेरा देश’ अभियानातंर्गत जनतेने घेतली ‘ पंचप्रण प्रतिज्ञा ‘

‘मेरी माटी मेरा देश’ अभियानातंर्गत जनतेने घेतली ‘ पंचप्रण प्रतिज्ञा ‘

0
64

blank

या अभियानांतर्गत महाराष्ट्रात नेहरू युवा केंद्र आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचारब्युरोच्या वतीने अनेक कार्यक्रमाचे आयोजन

हातात माती व पणती घेवून शूरवीरांना वाहिली आदरांजली

वसुधा वंदन तसेच अमृत कलश यात्रेसह विविध कार्यक्रम संपन्न

मुंबई, 9  ऑगस्ट, 2023 स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या समारोपानिमित्त ‘मेरी माटी मेरा देश’ या राष्ट्रव्यापी अभियानाचा आज देशभरात प्रारंभ करण्यात आला. देशासाठी बलिदान दिलेल्या शूर स्वातंत्र्यसैनिकांचा आणि शूरवीरांच्या स्मरणार्थ देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. संपूर्ण राज्यात नागरिकांनी पंचप्रण शपथ ग्रहण केली तसेच देशासाठी हौतात्म्य पत्करलेल्या शूरवीरांना हातात पणती घेवून आदरांजली वाहिली. या अभियानांतर्गत महाराष्ट्रात नेहरू युवा केंद्र आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्युरोच्या वतीने विविध ठिकाणी अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशासाठी बलिदान दिलेल्या शहीद वीरांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि नमन करण्यासाठी ‘मेरी माटी मेरा देश’ उपक्रमाअंतर्गत विविध जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्हा व तालुकास्तरीय कार्यालयांमध्ये देखील शपथ कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी, भारतास 2047 पर्यत ‘आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनविण्याचे स्वप्न साकार करू,’ ‘गुलामीची मानसिकता मुळापासून नष्ट करू’, ‘देशाच्या समृद्ध वारशाचा गौरव करू’, ‘भारताची एकात्मता बलशाली करु आणि देशाचे संरक्षण करणाऱ्यांप्रती सन्मान बाळगू’, ‘देशाचे नागरिक म्हणून सर्व कर्तव्यांचे पालन करू’ अशी ‘पंचप्रण शपथ’ सर्वांना देण्यात आली. तसेह जिल्हा, तालुकास्तरीय कार्यालये, तसेच ग्रामपंचायातींमध्ये, देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम, वृक्षारोपण कार्यक्रम, शहिदांना आदरांजली, शहिद वीरांच्या कुटुंबियांचा सन्मान असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. या अभियानात जिल्हाधिकारी तसेच मोठ्या संख्येने अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते.

या अभियानांतर्गत ‘वसुधा वंदन’ या उपक्रमातंर्गत् 75 देशी प्रजाती वनस्पतीची  लागवड केली जात आहे. तसेच देशासाठी ज्यांनी बलिदान दिले अशा थोर व्यक्तींची नावे शिलाफलकावर लिहिली असून या शिलाफलकाचे अनावरणही केले जात आहे.‘मेरी माटी मेरा देश’ अर्थात ‘माझी माती माझा देश’ या विविध जिल्ह्यातील विविध ठिकाणची वंदन केलेली माती गोळा करून एक कलश तयार केला जाणार असून हा कलश दिल्ली येथे 27 ते 30 ऑगस्ट या काळात होणाऱ्या समारंभासाठी पाठविण्यात येणार आहे.

या अभियानात अधिकाधिक नागरिकांना सहभाग घेता यावा यासाठी कार्यालये, नाट्यगृहे, अग्निशमन केंद्र, शाळा, टीएमटी बस आगार अशा विविध ठिकाणी देखील हे अभियान राबविण्यात आले. या अभियानात राज्यात मोठ्या संख्येने सर्व अधिकारी कर्मचारी सहभागी झाले. ‘मेरी माटी मेरा देश’ अर्थात ‘माझी माती माझा देश’ या अभियानातंर्गत 09 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या काळात  देशभर विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

blank

blank

blank

(भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरो, सोलापूरच्या वतीने रेल्वे लाईन येथील सोनामाता आदर्श विद्यालयामध्ये “मेरी माटी मेरा देश” अभियानाच्या सेल्फी बुथचे उद्घाटन करण्यात आले आणि पंचप्रण शपथ घेण्यात आली.)

या अभियानांतर्गत  नेहरू युवा केंद्र आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या  केंद्रीय संचार ब्युरोच्या वतीने राज्यात मुंबई, रत्नागिरी, पुणे, कोल्हपुर, अहमदनगर, परभणी, जालना, सोलापूर, जळगाव, नांदेड, बीड, अमरावती, उस्मानाबाद, लातूर, वर्धा, औरंगाबाद, चंद्रपूरधुळे, यवतमाळ इत्यादी ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त केंद्र सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या ‘मेरी माटी मेरा देश’ या राष्ट्रव्यापी अभियानात माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचारब्युरो विभागाचा देखील महत्वपूर्ण सहभाग आहे.

blank

हिंगोली

blank

अमरावती

blank

चंद्रपूर

blank

लातूर

blank

वर्धा

blank

रत्नागिरी

blank

जळगाव