परशुराम विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात

0
23

गोरेगाव,दि.०५– तालुक्यातील परशुराम विद्यालय मोहगाव बु येथे स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती व दुसरे राष्ट्रपती भारतरत्न डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणून साजरी करण्यात आली. सर्वप्रथम डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्ल्यार्पण करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक बी.डब्लु.कटरे होते.या प्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.तदनंतर स्वयंशासन च्या माध्यमातून विद्यार्थ्यांनीच अध्यापनाचे कार्य पार पाडले. अध्यापन करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन पर बक्षीस देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.शाळेचे सहाय्यक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यावेळी उपस्थित होते.