सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त स्वयंशासन दिवस साजरा

0
16

गोरेगाव,दि.0५-शिक्षक दिनाच्या निमित्ताने जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा डव्वा केंद्र गणखैरा येथे सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस साजरा करण्यात आला.यावेळी स्वयंशासन दिवस पाळण्यात आला.वर्ग ५,६ व ७ वीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या भुमिकेत शाळेची सर्व कामे स्वयंस्फुर्तीने पार पाडले. शाळाव्यवस्थापन समिती अध्यक्ष यश संजय बघेले, मुख्याध्यापक नियती गोपीचंद राऊत वर्ग 7 वी यांनी काम केले.परिचराची भुमिका वंश सुरेश कोल्हे वर्ग 7 वा यांनी केली. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.6 वीच्या विद्यार्थ्यांचा वाढदिवस साजरा नवनियुक्त शिक्षक व व्यवस्थापन समिती यांची केले.आनंदायी वातावरणात उपक्रम संपन्न झाला.यावेळी मुख्याध्यापक लोकचंद कावळे, सहाय्यक शिक्षक किशोर शहारे, हरिराम येळणे,सौ.कुमुदिनी सुपारे,कु.वैशाली राऊत यांनी सहकार्य केले.