तिरोडा- शिक्षण विभाग तिरोडाचे गटशिक्षणाधिकारी विनोद चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली खराशी पॅटर्न मार्गदर्शनपर कार्यशाळा दिनांक 9 सप्टेंबर 2023 ला गिरजाबाई हायस्कूल तिरोडा येथे संपन्न झाली.
कार्यशाळेला तिरोडा पंचायत समिती अंतर्गत दहा केंद्रातील निवडक 10 उत्कृष्ट शाळांचे सरपंच, अध्यक्ष, (शाळा व्यवस्थापन समिती), केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व सर्व शिक्षक उपस्थित होते.
कार्यशाळेला कुंताताई पटले (सभापती) अध्यक्ष म्हणून तर हुपराजजी जमईवार (उपसभापती) पंचायत समिती तिरोडा प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. विनोद चौधरी (गटशिक्षणाधिकारी), मुबारक सय्यद सर(मुख्याध्यापक ), डी. बी. साकुरे , अशोक बरईकर (शिक्षण विस्तार अधिकारी), राजलक्ष्मी तुरकर (मुख्याध्यापक), डॉ. रामप्रकाशजी पटले (सामाजिक कार्यकर्ता) उपस्थित होते.
खराशी पॅटर्ननुसार गुणवत्ता वाढीसाठी प्रायोगिक तत्त्वावर शिक्षण विभाग पं. स. तिरोडा अंतर्गत अर्जुनी, गोंडमोहाडी, बिहिरिया, चुरडी, चिखली, सुकळी सरांडी, कोडेलोहारा मनोरा व बयवाडा या जि. प.शाळांची निवड करण्यात आलेली आहे. या शाळांत खराशी पॅटर्ननुसार गुणवत्ता, लोकसहभाग, भौतिक सुविधा व नाविन्यपूर्ण दर्जेदार उपक्रम राबविले जाणार आहे.
मुबारक सय्यद सर (मुख्याध्यापक) पारडी जिल्हा- भंडारा यांनी खराशी पॅटर्ननुसार शाळा तयार करण्यासाठी स्वतः शाळेकरीता केलेले कार्य , राबविलेले उपक्रम , घेतलेले लोकसहभाग याविषयी कार्यशाळेत सविस्तर माहिती दिली. शाळेत राबविले जाणारे उपक्रम करीता प्रत्यक्ष शाळाभेट करून मार्गदर्शन करण्याविषयी उपस्थितसर्वाना आश्वासन दिले.
गुणवत्ता कार्यशाळेच्या प्रास्ताविकात अशोक बरईकर यांनी शाळेत सुरू असलेल्या उपक्रमाविषयी माहिती दिली. शिष्यवृत्ती परीक्षा व नवोदय परीक्षा विषयी मार्गदर्शन केले. कार्यशाळेला सुनीता रहांगडाले (सरपंच) अर्जुनी, कैलास पटले (सरपंच) चिखली, पुष्पलता गौतम (सरपंच) आलेझरी, सपना ईनवते चूरडी, ज्योती पटले अर्जुनी, सुनील पटले चिखली व सोमेश्वर चौधरी आलेझरी अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन कु.ज्योती पारधी यांनी केले तर उपस्थितांचे आभार विनोद चौधरी (गटशिक्षणाधिकारी) यांनी मानले कार्यशाळा यशस्वी करण्यास्तव ब्रजेश मिश्रा (गटसमन्वयक), सुनील ठाकरे , नरेंद्र बारेवार, देविदास हरडे व प्रतिभा लांडगे विषय तज्ञ गटसाधन केंद्र तिरोडा यांनी मोलाचे योगदान दिले.
खराशी पॅटर्ननुसार शाळेची गुणवत्ता वाढीस लागणार असून याकरीता पंचायत समिती तिरोडा कडून योग्य ते सहकार्य आम्ही नक्कीच करू. असे विचार कुंताताई पटले (सभापती) यांनी व्यक्त केले. हुपराजजी जमईवार (उपसभापती) म्हणाले की निवड केलेल्या उत्कृष्ट दहा शाळांना आवश्यक भौतिक सुविधा पुरविण्यात येईल. गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाईल. त्यामुळे कॉन्व्हेंट मध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ओघ नक्कीच कमी होईल.
विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण दर्जेदार शिक्षण मिळावेत. डिजिटल साहित्याच्या वापर प्रभावीपणे अध्यापनात व्हावा. लोकसभागातून शाळेच्या दर्जा वाढीस लागावा, याकरीता खराशी पॅटर्ननुसार उपक्रमाला सुरुवात केली आहे. सातत्याने उपक्रमाच्या आढावा घेतला जाईल व मार्गदर्शन केले जाईल.असे विनोद चौधरी गटशिक्षणाधिकारी म्हणाले.