क्षेत्रातील शेवटचा घटकाच्या विकासासाठी शेवटच्या श्वासापर्यंत झटत राहणार-इंजि.यशवंत गणविर

0
14

अर्जुनी मोर.दि.07 :–तालुक्यातील गवर्रा येथे क्रांतीसुर्य महामानव भगवान बिरसा मुंडा स्मारकजवळ वाचनालय व आवारभिंतिच्या बांधकामांचे भुमिपुजन संपन्न झाले.या कार्यक्रमाप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना गणविर म्हणाले,आपला क्षेत्र हा अतिदुर्गम आदिवासी बहुल नक्षलग्रस्त क्षेत्र आहे,आणि मागील कित्येक वर्षांपासून विकासापासून कोसो दुर आहे,त्यामुळे आजही आपल्या क्षेत्रातील शेवटचा घटक वंचित आहे.त्या शेवटचा घटकाचा विकास व त्याची क्रयशक्ती वाढविण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहणार.कारण शेवटच्या घटकाचा विकास झाल्याशिवाय क्षेत्राचा विकास होणार नाही.
पुढे बोलताना ते म्हणाले,आज आपल्या छोट्याशा गावात वाचनालयाच्या इमारतीचे भूमिपूजन करताना आनंद गगणात मावेनासा झाला कारण या गावातील युवा मित्रांची जिद्द आणि चिकाटी,मागील तीन वर्षांपासून त्यांनी रेटुन धरलेल्या मागणीला यश मिळाले.युवा मित्रांनी केलेल्या त्यांच्या या कार्याला मी सलाम करतो.आनंद वाटतो की, अतिदुर्गम आदिवासी बहुल क्षेत्रातील युवा जागृत होऊन समाजकार्यात आपला सहभाग दर्शवतो यांच्या कडुन प्रेरीत होऊन आपल्या गावातील इतर युवा सुद्धा समोर येऊन काम करतील आणि गावाच्या विकासात हातभार लावतील असे प्रतिपादन त्यांनी केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार मनोहर चंद्रिकापुरे, प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सदस्या आम्रपाली डोंगरवार, रांकापा तालुकाध्यक्ष लोकपाल गहाणे, सरपंच नरेंद्र लोथे, उपसरपंच सचिन साखरे, रांकापा विधानसभा अध्यक्ष योगेश नाकाडे, माजी पंचायत समिती सदस्य दिनदयाल डोंगरवार, प्रल्हाद वंजारी तथा ग्रामपंचायत सदस्य व गावकरी उपस्थित होते.