कर्मचाऱ्यांच्या उर्मट वागणुकीमुळे बँक उतरली जनतेच्या नजरेतून

0
80

( यूनीयन बँक तिबेट कॅम्प गोठणगाव )
“ साहेब या शाखा व्यवस्थापकांला लगाम घाला अन्यथा बँकेला टाळे ठोकू ‘
अर्जुनी मोर. ( सुरेंद्रकुमार ठवरे )
केशोरी परिसरासाठी युनियन बँक ऑफ इंडिया एक राष्ट्रीयकृत बँक असून या बँकेला हजारोंच्या संख्येने खातेदार जोडले आहेत त्यामुळे दैनंदिन व्यवहार करताना बँकेत ग्राहकाची गर्दी असतेच. मात्र मोठ्या – मोठ्या व्यापारी व उद्योजकांना सन्मानपूर्वक वागणूक देऊन सामान्य गोरगरीब मात्र ताटकळत उभे करून शाखा व्यवस्थापक व इतरही कर्मचारी व सापत्न वागणूक देतात मानहानीचे निंदनीय प्रकार या बँकेमध्ये सुरू आहेत. नागरिकांनी त्यांना याबाबत हटकले तर “ तुम्हाला जायचं तिथे जा माझी बदली करून घ्या, अशा पद्धतीची मुजोर भाषा शाखा व्यवस्थापकाकडून केली जाते. ही बँक सर्व सामान्यांसाठी नकोशी झाली आहे त्यामुळे साहेब या उर्मट शाखा व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांवर लगाम लावा अन्यथा बँकेला टाळे ठोकू असा संतापजक ईशारा नागरिकांनी दिला आहे.
युनियन बँक ऑफ इंडिया शाखा तिबेट कॅम्प गोठणगाव केशोरी व परिसरातील ३० ते ४० गावांसाठी एक जुनी राष्ट्रीयकृत ग्राहकांची विश्वासपात्र बँक होती.मात्र गेल्या एक वर्षांपासून कर्मचाऱ्यांच्या अरेरावीपणामुळे सुविधा देण्यात टाळाटाळ करण्याच्या दूषित प्रवृत्तीमुळे नकोशी झाली असून अनेक ग्राहक खाते बंद करण्याच्या निर्णयापर्यंत पोहोचलेले आहेत.या बँकेत गंधारी जांभळी गोठणगाव बोंडगाव ते राजोली भरणोली तिरखुरी ईळदा अशा तालुक्याच्या अखेरच्या टोकावरीलही नागरिकांचा संपर्क येतो आर्थिक देवाण घेवाण, आयकर करिता लागणारी मिनी स्टेटमेंट करिता आलेल्या ग्रामीण भागातील ग्राहकाला दिवसभर रोजगार बुडवून ताटकळत उभे राहावे लागते.नेहमी कर्मचाऱ्यांची कमतरता सांगून टाळाटाळ केली जाते.कधी मॅनेजर गायब तर कधी लिपिक गायब यामुळे नागरिकांचा संताप वाढत चालला आहे. सर्व सोयी सुविधा ग्राहकांना द्यावयाच्या असतील तर व्यवस्थित आणि सुरळीत मिळाव्यात आणि जर कामाचा भार पडत असेल या उर्मट कर्मचाऱ्यानी राजीनामे दावे अशाच प्रकारची दुय्यम वागणूक असेल तर बँकेला टाळे ठोकू असा रोष जनतेतुण येत आहे.

“ नागरिकांना सोप्या व सहज पद्धतीने आर्थिक व्यवहार करता यावेत व देशाच्या शेवटच्या नागरिकास सुद्धा बँकींगच्या मुख्य प्रवाहात येता यावे म्हणून १९ जुलै १९६९ रोजी भारत सरकारने देशातील अनेक बँकांचे राष्ट्रीयीकरण केले. “ बँकेत यायचे असेल तर त्रास सहन करा अन्यथा आपले खाते बंद करा.आमचा पगार बंद होणार अशी उद्धट भाषा शाखा व्यवस्थापक आणि ईतर कर्मचारी व्यक्त करतात त्यामुळे ही शाखा ग्राहकांच्या नजरेतून उतरत चालली आहे.प्रशासनाने याची दखल घेऊन या मुजोर कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी आणि केशोरी व परिसरात राष्ट्रीयकृत बँक देण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य श्रीकांत घाटबांधे यांनी केली आहे. ‘