आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम साजरा

0
16

गोंदिया, दि.30 : आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय गोंदिया मार्फत राजस्थान कन्या विद्यालय गोंदिया येथे 26 ऑक्टोबर 2023 रोजी कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर एस.व्ही. पिंपळे उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाचे मार्गदर्शक ॲड. प्रीती तुरकर व विद्यालयाच्या  मुख्याध्यापिका निर्मला पुरोहित उपस्थित होते.

          कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणामध्ये  न्यायाधीश श्री. पिंपळे यांनी विद्यार्थीनींना लीगल एड ची  सहायता कशी घेता येईल या विषयावर सविस्तर माहिती देवून लहान मुलांना शिक्षणाचे महत्व काय आहे तसेच शालेय जीवनासंबंधी आवश्यक गोष्टी सांगितल्या, जेणेकरून मुलांच्या व्यक्तिमत्व विकासात भर पडेल याबद्दल मार्गदर्शन केले.

         ॲड. प्रीती तुरकर यांनी उपस्थित विद्यार्थीनींना मुलींचे मौलिक अधिकार समजावून सांगीतले व आपले भविष्य उज्जवल करण्याकरिता प्रोत्साहित केले. तसेच लहान मुलांना अभ्यास कसे करावे, शिक्षकांनी  दिलेले स्वाध्याय करुन यावे तसेच आई-वडिलांचे, वडीलधाऱ्यांचे ऐकावे व भविष्यामध्ये तुम्हाला मोठे होऊन काय बनायचे आहे याचे ध्येय समोर ठेवून खूप अभ्यास करावे व आपला व आपल्या आई-वडिलांचे नाव मोठे करावे असे त्यांनी सांगीतले.

        कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संजय चौधरी यांनी केले तर उपस्थितांचे आभार आशु रहांगडाले यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिला न्यायालय गोंदिया  येथील  कर्मचारी  पी.बी अनकर- अधीक्षक, पी.एन.  गजभिये, एल.ए. दर्वे, के.एस. चौरे, बी.डब्ल्यू. पारधी तसेच विद्यालयातील अध्यापक वर्ग यांनी मोलाचे सहकार्य केले.

000000