अर्जुनी मोरगांव:-( सुरेंद्रकुमार ठवरे )अर्जुनी मोरगांव तालुका हा धान उत्पादनासाठी प्रख्यात आहे. धानाचे कोठार म्हणुनही या तालुक्याकडे पाहिले जाते.सध्या धानाची कापनी व मळणी जोरात सुरु आहे. दिवाळी आठ दिवसांवर येवुन ठेपली आहे. मात्र अजुनपर्यंत हमी भाव धान खरेदी केंद्र सुरु झाले नाही. त्यामुळे शेतक-यांना अल्पभावात व्यापा-यांना धान विकण्याची पाळी आली आहे. त्याकरिता हमी भाव धान खरेदी केंद्र त्वरीत सुरु करा असी मागणी अर्जुनी मोर. चे नगरसेवक तथा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे गोंदिया जिल्हा उपाध्यक्ष दानेशभाऊ साखरे यांनी केली आहे.
अर्जुनी मोर. तालुक्यात कोणतेच लहानमोठे उद्योग धंदे नाहीत.धान शेतीवरच शेतक-यांना अवलंबून राहावे लागते. ईटियाडोह व नवेगावबांध जलाशय तालुक्यात असले तरी अर्धा तालुका हा कोरडवाहु आहे. त्यामुळे तालुक्यातील धान उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात हलक्या धानाची लागवड करतात. दिवाळी पुर्वीच हलक्या धानाची फसल निघते.त्यामुळे शेतक-यांची दिवाळी आनंदाने साजरी होते.मात्र शासनाचे हमी भाव धान खरेदी केंद्र दिवाळीपुर्वी सुरु न झाल्याने धान कुठे विकायचे हा प्रश्न शेतक-यांसमोर दरवर्षीच उभा राहतो.अशावेळी पर्याय नसल्याने शेतक-यांना अल्पभावात व्यापा-यांना धान विक्री करावा लागतो. शेतकरी यांची ही समस्या लक्षात घेता शासनाच्या मार्केटिंग फेडरेशन तथा आदिवासी विकास महामंडळानी त्वरीत हमी भाव धान खरेदी केंद्र सुरु करावे असी मागणीही दानेशभाऊ साखरे यांनी केली आहे.