तिरोडा:– जिल्ह्यात २७ नोव्हेंबर ला जिल्हयात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने मोठ्या प्रमाणात धान उत्पादक शेतक-यांचे नुकसान झालेले आहे गोंदिया जिल्ह्यात शेतक-यांचा मुख्य व्यवसाय धान उत्पादन असून यातून मिळणा-या उत्पानातून आपली उपजीविका भागवीत असते सद्या धान कापणीचे दिवस सुरू असून बहुतांश शेतक-यांचे धानपिक कापून ठेवेलेले आहेत व कित्येक शेतक-यांच्या शेतात उभे धानपिक आहेत अशा परीस्थितीत अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतातील धानाचे कळप तसेच उभे धानपिक पाण्याखाली आल्याने मोठे नुकसान झालेले असूनशेतक-यांसमोर आर्थिक संकट निर्माण झालेले आहे तेव्हा शासनाकडून आर्थिक मदत मिळावी याकरिता तातडीने अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून शासनाकडे पाठविण्याबाबतचे पत्र जिल्हाधिकारी महोदयांना तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांनी दिले आहे