सिलेझरी सरपंच पदी लता भेंडारकर यांची निवड

0
30

अर्जुनी मोर. :- तालुक्यातील सिलेझरी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी बुधवार तारीख 29 घेण्यात आलेल्या सरपंच पदाच्या निवडणुकीत लता दिनेश भेंडारकर यांची बहुमताने सरपंच पदी निवड करण्यात आली.
सिलेझरी ग्रामपंचायतचे सरपंच पद सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आले होते ग्रामपंचायतचे सरपंच सुनीता ब्राह्मणकर यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या सरपंच पदाची निवड करण्यासाठी प्रभारी तहसीलदार गणेश सोनोणे यांनी कार्यक्रम जाहीर करून अध्यासी अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी यु. एस. वागधरे यांची नियुक्ती केली होती. सरपंच पदाची निवड करण्यासाठी बुधवार दिनांक 29 विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नऊ ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. अखेर दोन उमेदवार सरपंच पदाच्या निवडणुकीत तटस्थ राहिल्याने मतदानाची प्रक्रिया राबविण्यात आली.यामधे लता दिनेश भेंडारकर यांना सर्वाधिक जास्त मते पडल्याने त्यांची सरपंच पदी बहुमताने निवड झाल्याचे अध्यासी अधिकारी वागधरे यांनी जाहीर केले .सभेचे कार्य वृत्तांत लिहिण्याची कामगिरी ग्रामसेवक बी. आय. पटणे यांनी पार पाडली.