
. पक्षकार व नागरिकांना दिलासा
गोंदिया, दि.12 : राष्ट्रीय लोक अदालतमध्ये एकूण ठेवलेल्या प्रकरणांपैकी 10 हजार 81 प्रकरणे निकाली काढण्यात आली व एकूण रुपये 4 कोटी 20 लाख 56 हजार 803 एवढी वसुली करण्यात आली. जिल्ह्यातील न्यायालयात प्रलंबीत दिवाणी प्रकरणांपैकी 61 प्रकरणे निकाली काढण्यात आली व यामध्ये रुपये 1 कोटी 42 लाख 06 हजार 945 वसुलींचे प्रकरणे निकाली निघाले. न्यायालयात प्रलंबीत फौजदारी प्रकरणांपैकी 921 प्रकरणे निकाली काढण्यात आली व रुपये 2 कोटी 8 लाख 84 हजार 838 वसुलींचे प्रकरणे निकाली निघाली. तसेच लोकअदालतमध्ये ठेवण्यात आलेले पुर्वन्यायप्रविष्ठ प्रकरणांपैकी 9 हजार 99 प्रकरणे निकाली काढण्यात आली व यामध्ये 69 लाख 65 हजार 20 रुपयांची वसुली झाली.
वर्षानुवर्षे न्यायालयात प्रलंबित असलेले खटले समोपचाराने व सामंजस्याने तात्काळ निकाली काढण्याकरिता राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांचे निर्देशानुसार अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, गोंदिया ए. टी. वानखेडे तसेच सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण एस. व्ही. पिंपळे यांचे मार्गदर्शनाखाली 9 डिसेंबर 2023 रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय गोंदिया येथे तसेच जिल्ह्यातील सर्व तालुका विधी सेवा समित्यांमार्फत तालुका न्यायालयांमध्ये सर्वच प्रकारच्या तडजोड पात्र न्यायप्रविष्ठ व पूर्व न्याय प्रविष्ठ प्रकरणाकरिता तसेच विद्युत व बँक लोकोपयोगी पूर्व न्यायप्रविष्ठ प्रकरणांकरीता राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते.
त्याचप्रमाणे स्पेशल ड्रईव्ह अंतर्गत जिल्ह्यातील न्यायालयामध्ये ठेवण्यात आलेल्या फौजदारी प्रकरणांपैकी 787 प्रकरणे निकाली काढण्यात आली. यामुळे पक्षकार व इतरांना होणारा मानसिक व आर्थिक त्रास यामधून सुटका मिळाली. यामुळे बऱ्याच पक्षकारांनी समाधान व्यक्त केले. या लोक अदालतीची विशेष बाब म्हणजे विद्युत, पाणी टेलिफोन, बँक रिकव्हरी यांचे पुर्वन्यायप्रविष्ठ प्रकरणातील ज्या पक्षकारांनी तडजोडीप्रमाणे थकबाकीची पूर्ण रक्कम संबंधित विभागाला जमा केली त्यांची प्रकरणे कायमची संपवण्यात आली. यामुळे संबंधीत विभाग व थकबाकीदारांचा भविष्यातील न्यायालयीन खर्च व मानसिक त्रास वाचला.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. टी. वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव एस. व्ही. पिंपळे, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड. सी. के. बडे, जिल्हा वकील संघाच्या उपाध्यक्ष ॲड. आरती भगत यांचे प्रमुख उपस्थितीत लोक न्यायालयाचे उद्घाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. टी. वानखेडे तसेच जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड. सी. के. बडे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. टी. वानखेडे यांनी लोक अदालतीचे फायदे व महत्व याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.
प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्याकरिता गोंदिया येथील ए. एम. खान, जिल्हा न्यायाधीश -1 तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश गोंदिया, एन. डी. खोसे, जिल्हा न्यायाधीश-2 तथा अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश, एन. बी. लवटे तदर्थ न्यायाधीश-1 तथा अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश, आर. एस. कानडे, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, ए. व्ही. कुलकर्णी मुख्य न्यायदंडाधिकारी, वाय. आर. मुक्कणवार कामगार न्यायाधीश कामगार न्यायालय गोंदिया, एस. आर. मोकाशी सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, एस. एस. धपाटे 2 रे सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, व्ही. ए. अवघडे, सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, एम. बी. कुडते 3 रे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, वाय. जे. तांबोळी 4 थे सह दिवानी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, एस. डी. वाघमारे 5 वे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, टी. व्ही. गवई 6 वे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर यांनी व जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष सी. के. बडे, उपाध्यक्ष ॲड. आरती भगत, सचिव एस. आर. बोरकर व इतर पदाधिकारी तसेच पॅनलवरील वकील ॲड. कांचन ठाकरे, ॲड. कमलेश चिखलोंढे, ॲड. तेजस रुपारेल, ॲड. राहुल सिक्का, ॲड. कुसुम कटरे, ॲड. युगुल पारधी यांनी सहकार्य केले.
सदर लोक अदालतीचे यशस्वी आयोजनाकरिता पी. बी. अनकर प्रबंधक, एम. पी. पटले सहायक अधीक्षक जिल्हा न्यायालय गोंदिया, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथील ए. एम. गजापुरे वरिष्ठ लिपीक, सचिन कठाणे, पी. एन. गजभिये, के. एस. चौरे, एल. ए. दर्वे, प्रिती जेंगठे, नेहा चौरसिया कनिष्ठ लिपीक तसेच ए. पी. मेश्राम लेखापाल, बी. डब्ल्यु. पारधी, रोहित मेंढे शिपाई, नितीन चिंधालोरे बेलिफ, टी. ए. पडोळे, एस. के. भोयर, पॅरा लिगल व्हालंटिअर्स गोंदिया तसेच इतर न्यायालयीन कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.




