
अर्जुनी मोर.,दि.17– जलसंपदा विभाग लाभक्षेत्राचे मुख्य सचिव संजय बेलसरे हे ईटियाडोह धरणाच्या निरिक्षणासाठी आले असता धरण्याचा मुख्य कालवा व पाटचारी दुरुस्तीकरीता निधी उपलब्ध करुुन द्यावे अशी मागणी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा सभापती शिक्षण क्रीडा व आरोग्य इंजि यशवंत गणविर निवेदनाद्वारे केली.
सन १९६३-६४ मधे ईटियाडोह धरणाचे काम पूर्ण झाले व गोंदिया भंडारा व गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा फायदा झाला.परंतु ईटियाडोह धरणाच्या कालव्यात मोठ्या प्रमाणात गाळ जमा झाले असुन त्यामुळे जेव्हा कालव्यातून पाणी पुरवठा केला जातो, त्यावेळी कालवा नेहमी फुटत असतो.त्याचप्रमाणे कालव्याच्या निरीक्षण पथावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले असुन दुतर्फा व कालव्यात झाडे व झुडपांची मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
ईटियाडोह धरणातून कालव्यातून जेवढे पाणी सोडल्या जाते त्यापैकी मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होतो, हि गंभीर बाब लक्षात घेऊन आपण सदर कालव्याच्या व निरिक्षण पथाच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली.यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य रतिराम राणे, डॉ.अविनाश काशीवार, शिवाजी गहाणे,सर्व पाणी वापर संस्थाचे अध्यक्ष व ईटियाडोह प्रकल्पाचे कर्मचारी उपस्थित होते.




