40.6 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home विदर्भ पाण्याचा थेंब अन् थेंब वाचविण्यासाठी लोकसहभागातून प्रयत्नांची गरज.

पाण्याचा थेंब अन् थेंब वाचविण्यासाठी लोकसहभागातून प्रयत्नांची गरज.

0
25

blank

JJM प्रशिक्षणातून निघाला सूर, प्रशिक्षण समारोप थाटात

गोंदिया ता.17 डिसेंबर :-पाण्याचा एक एक थेंब अन् थेंब वाचविण्यासाठी लोकसहभागातून प्रयत्नांची गरज आहे, असा सूर जल जीवन मिशन प्रशिक्षण कार्यक्रमातून निघाला.तालुक्यात येणाऱ्या कुडवा, रावणवाडी, एकोडी, फुलचूर येथे आयोजित 3 दिवशीय जल जीवन मिशन प्रशिक्षणाचा आज (ता.17) समारोप थाटात झाला.
रावणवाडी प्रशिक्षण केंद्रात सेवानिवृत कार्यकारी अभियंता संजय कटरे,तसेच ग्रामसेवक संतोष परमार आणि पृथ्वीराज कोल्हटकर यांनी प्रवीण प्रशिक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली. यावेळी प्रक्षेत्र भेटीचे अनुभव कथन, शासकीय योजनांचे अभिसरण, पाणीपुरवठा संबंधित कामासाठी उपलब्ध निधीचे स्रोत,15 व्या वित्त आयोगाच्या तरतुदी, निधीच्या स्रोतांचा शोध खेळ, समुदाय संगठन आणि लोकसहभागाचे महत्व आदि विषयांवार प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आलं . दरम्यान गट चर्चा करण्यात आली. यावेळी प्रशिक्षणार्थ्यांनी प्रशिक्षणाविषयी आपले मनोगत व्यक्त करून नागपूरचे पंचायत राज प्रशिक्षण केंद्र आणि गोंदिया जिल्हा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या प्रशिक्षण कार्यक्रमाची तोंड भरून प्रशंसा केली. यावेळी तालुका समन्वयक मुकुंद गजभिये यांच्या तत्परतेने प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.

blank