
देवरी,दि. 24: देवरी येथील आमदार कोरोटे भवनात या क्षेत्राचे आमदार सहषराम कोरोटे यांच्या कार्यशैली व विकास कार्याशी प्रभावीत होऊन राजीक खाॅन यांच्या मार्गदर्शनात आमदार कोरोटे यांच्या हस्ते काँग्रेस पक्षाचा दुपट्टा घालून विविध पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी आज रविवारी (दि.२४ डिसेंबर ) रोजी आपल्या पक्षाला रामराम ठोकून काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
प्रवेश करणा-यांमध्ये शौरभ शर्मा येजाज खाॅन(छोटू), संजय राऊत, कृष्णा टेंभुरकर, मुनेश्वर जांभुळकर, प्रेम राऊत, अभिषेक राऊत,याकूब टेंभुरकर, उमेश नंदागवळी, कुलदीप राऊत, हंसराज शहारे, गवतराम धमगेश्वर, कुलदीप कोटांगले, सौ. रीनाताई सहारे, सौ.ज्योतीताई राऊत, सौ.संगीताताई धुर्वे, सौ.सिमरनताई राऊत, सौ.आशाताई चौरे, सौ.स्वातीताई नंदागवळी या कार्यकर्त्यांचा समावेश आहे.यांचा आमदार कोरोटे यांनी पक्षात स्वागत केले.
आमदार कोरोटे यांच्या नेतृत्वाखाली अनेकांनी कांग्रेस पक्षात प्रवेश केल्याने आमगाव -देवरी विधानसभा क्षेत्रात कांग्रेस पक्षाला आणखी बळकट करण्यात मदत होईल.
अनेक कार्यकर्त्यांनी कांग्रेस पक्षात प्रवेश केल्याने कांग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष संदिप भाटिया,शहर अध्यक्ष ओमप्रकाश रामटेके,माजी तालुका अध्यक्ष राधेश्याम बगडीया, महिला कांग्रेस तालुकाध्यक्ष सुनंदाताई बहेकार,युवक कांग्रेसचे दिपक (राजा) कोरोटे, नगर सेवक शैंकी भाटिया,मोहन डोंगरे, नितीन मेश्राम,शकील कुरेशी, बळीराम कोटवार, जैपाल प्रधान,नरेश राऊत, सुरेन्द्र बन्सोड व छगनलाल मुंगनकर आदींनी अभिनंदन केले आहे.





