जिल्हास्तरीय अटल क्रीडा महोत्सवाच्या समापन सोहळ्यासाठी यंत्रणा सज्ज

0
10
समारोपाला अभिनेत्री दीपिका सह बॉलीवूड गायक जॉली मुखर्जी व कॉमेडियन व्हीआयपी यांची उपस्थिती 
गोंदिया– जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना खेळ व सांस्कृतिक मंच उपलब्ध करून देण्याचा संकल्प जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पंकज रहांगडाले यांनी केला. व जिल्ह्यात अटल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाला सुरुवात झाली. त्या अनुषंगाने बीट व तालुका स्तरावरील कार्यक्रम संपन्न झाले असून जिल्हास्तरीय अटल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव दि. 22 डिसेंबर ते 25 डिसेंबर 2023 या कालावधीत स्थानीय जिल्हा क्रीडा संकुलात आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 25 डिसेंबर 2023 ला अटल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचा पुरस्कार वितरण समारोह दुपारी 4:00 वाजता शहीद जान्या तिम्या जिल्हा परिषद हायस्कूल, गोरेगाव येथे होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले राहणार असून कार्यक्रमाला दिपप्रज्वलक म्हणून राज्यसभा खासदार प्रफुल पटेल, लोकसभा खासदार  सुनील मेंढे, अशोक नेते उपस्थित राहणार आहेत. बक्षिस वितरणाला विशेष उपस्थिती म्हणून  सौ. दीपिका चिखलिया अभिनेत्री माजी खासदार (सितामता रामायण फेम), बॉलिवूड गायक जॉली मुखर्जी तसेच हास्य कलाकार व्हीआयपी  विजय पवार, यांची विशेष उपस्थिती असणार आहे. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती मध्ये सर्वश्री विधानसभा सदस्य आमदार  विजय रहांगडाले, विनोद अग्रवाल, मनोहर चंद्रिकापुरे,  सहेसराम कोरोटे,  विधानपरिषद सदस्य आमदार  अभिजित वंजारी, सुधाकर अडबाले, जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंजि. यशवंत गणवीर, जिल्हाधिकारी  चिन्मय गोतमारे (भा प्र से) व पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे (भा पो से) उपस्थित राहणार आहेत.
अटल क्रिडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन दरवर्षी : जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले शैक्षणिक प्रगती सोबत विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकास व्हावा. विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक तसेच शारीरिक खेळांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा या उद्देशाने अटल क्रिडा व संस्कृतीक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून यामुळे अनेक प्रतिभा बाहेर येतील आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकतील असा विश्वास जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले यांनी व्यक्त केला.