संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदार संघात शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे विजयी झाल्या आहेत. येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला आहे. अजित पवारांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
प्रचारासाठी दोघांनी जोर लावला होता. सुप्रिया सुळेंनी 16 व्या फेरी अखेर मोठी मुंसडी मारली आहे. सुप्रिया सुळेंना 1 लाख आठ हजार 490 चा लीड मिळाला आहे.. राष्ट्रवादीमध्ये फुट पडल्यानंतर बारामतीची जागा ही पवार कुटुंबाठी प्रतिष्ठेची बनली होती. येथे प्रथमच पवार विरुद्ध पवार असा झाला. बारामतीची जागा पवार कुटुंबांसाठी अत्यंत महत्वाची बनली होती. अजित पवार यांनी येथे आपल्या पत्नी सुनेत्रा पवार यांना मैदानात उतरवलं होतं.
सुनेत्रा पवारांचा दारुण पराभव
अगदी मतदान होईपर्यंत हा मतदार संघ चर्चेत होता. येथे शरद पवार गटाने विजयी मोहोर उमटवली आहे. महायुतीसाठी देखील हा आता धक्का मानला जात आहे. निकाल लागण्यापुर्वी अजित पवारांनी मोठं वक्तव्य केलं होतं. सुप्रिया सुळे यांच्यासोबत प्रचारात दिसत असलेला एकही जण 4 जूननंतर दिसणार नाही, जर एकही जण दिसला तर माझ्या मिशा काढेन, असं अजित पवार म्हणाले होते. आता येथे सुळे विजयी झाल्या आहेत. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांनी देखील गर्दी केली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात सध्या अजित पवार आपल्या विधानावर ठाम राहणार काय?, याबाबत आता बोललं जातंय.
या निवडणुकीत महाविकास आघाडीने आपली छाप सोडली आहे. दक्षिण मध्य मुंबईत शिवसेना ठाकरे गटाचे अनिल देसाई विजयी झाले आहेत. शिवसेना शिंदे गटाच्या राहुल शेवाळेंचा पराभव झाला आहे.सांगलीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील विजयी झाले आहेत. भाजपचे संजय काका पाटील पराभूत झाले आहेत.
सुप्रिया सुळे विजयी
तसंच नंदुरबारमध्ये काँग्रेसचे गोवाल पाडवी विजयी झाले आहेत. तर भाजपच्या हिना गावित यांचा पराभव झाला आहे.शिरुर मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचा विजय झाला आहे, अमोल कोल्हे हे भरघोस मतांनी निवडून आले आहेत. तर अजित पवार गटाच्या आढळराव पाटलांचा पराभव झाला आहे.