गोंदिया जिल्ह्यातील चूलबंध जलाशयाजवळ एफ.डी.सी.एम गेस्ट हाऊसमध्हेे शिरलेल्या जखमी बिबट्याचे, आज सकाळी रेस्क्यू करुन बाहेर काढण्यात आले.
उपस्थित वन कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान बघत त्याला रूम मध्ये बसलेला बघत बिबट्याला दार बंद केले. लगेच माहिती वरिष्ठांना कळवली, rescue करीता RRT गोंदिया व NNTR यांना पाचारण करण्यात आले,.दुपारून 2 वाजता बिबटला जेरबंद करण्यात आले. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक उपचार करत पुढील उपचारा करीता नागपूर हलविणे योग्य राहील असे सांगितले. सदर बिबटच्या गळ्यावर जखम निदर्शनात आली, दुसऱ्या मोठ्या मांसभक्षी सोबत झुंजी मध्ये बिबट जखमी झाला असावा असे लक्षात आले.
रेस्कू दरम्यान जागेवर संतोष गांधीले डीविजनल मॅनेजर एफडीसीएम, सावन बहेकार सेवा संस्था अध्यक्ष, श्री बागडे वनपरिक्षेत्र अधिकारी चुलबंध रोपवाटिका, पशुैद्यकीय अधिकारी देवेंद्र कटरे, चंद्रशेखर मालापुरे, संतोष रहांगडाले तसेच एफडीसीम चे कर्मचारी, RRT चे चमू, सेवा संस्थेचे सदस्य उपस्थित होते.