
गोंदिया : महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या विविध मागण्या संदर्भात शासन स्तरावर कोणतीही कारवाई होत नसल्याने पुन्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने आंदोलनाची भूमिका घेण्यात आली आहे. हे आंदोलन १० जुलैपासून करण्याचा इशारा निवेदनाच्या माध्यमातून जिल्हाधिकार्यांना देण्यात आला आहे.
यापुर्वी झालेल्या आंदोलनात राज्य शासनाने राज्य महूसल कर्मचार्यांना मागण्या पुर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्या आश्वासनाची पुर्तता होत नसल्याने महाराष्ट्र राज्यातील सर्व महसुली कर्मचारी हे दिनांक १० जुलैपासून टप्प्याटप्प्याने आंदोलन करणार आहेत. १० जुलै रोजी काळ्याफिती लावून काम करणे, ११ रोजी दुपार नंतर कार्यालयावर निदर्शने, १२ जुलै रोजी लेखनीबंद आंदोलन तर १५ जुलैपासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्यात येणार आहे. तरी या आंदोलनात सर्व महसूल कर्मचार्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे राज्य सहसचिव तसेच गोंदिया जिल्हाध्यक्ष आशिष रामटेके केले आहे. विशेष म्हणजे निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी तसेच राज्य शासनाला पाठविण्यात आली आहे.




