
गोंदिया,दि.०३- महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ (आयटक ) च्या नेतृत्वात आज गोंदिया तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी गोंदिया पंचायत समिती कार्यालया वर मोर्चा काढून धरणें आंदोलन केले . राज्य महासंघाचे कार्याध्यक्ष मिलिंद गणवीर, आयटक चे जिल्हा सचिव रामचंद्र पाटील, तालुका अध्यक्ष देवेंद्र मेश्राम, सचिव विनोद सहारे,, कार्याध्यक्ष महेंद्र कटरे यांचे नेतृत्वात हा मोर्चा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सेवाशर्तीचे पालन करने, प्रलंबित वेतन भत्ता, भविष्य निर्वाह निधी अदा करने, सेवाशर्ती चे पालन न करणाऱ्या अधिकाऱ्यावर कार्यवाही करने आदी मागण्याचे निवेदन सहाय्यक गट विकास अधिकारी यांना सादर करण्यात आले. मागण्याबाबत विस्तृत चर्चे करिता गटविकास अधिकारी यांनी लिखित पत्र देवून दि. 4 जुलै ला बैठकीचे आयोजन केल्याच्या आश्वासनानंतर आंदोलन समाप्त करण्यात आले.या आंदोलनात प्रामुख्याने भाऊराव कटंगकार, सुनील लिल्हारे, मोहन डोंगरे, माणिक उके, मुकेश बिसेन, जगदीश ठाकरे, मुरलीधर पटले, आदी कार्यकर्ता कर्मचारी मोठ्या संख्येत सहभागी झाले होते .





