
गोरेगाव,दि.१७ः तालुक्यातील गणखैरा येथील आंगणवाडी केंद्र क्रमांक 2 च्या नवनिर्मित इमारतीचे लोकार्पण सरपंच संतोष आदमने यांच्या हस्ते करण्यात आली.सदर इमारत ही 14 वित्त आयोग व मनरेगा अंतर्गत तयार करण्यात आली. यावेळी उपसरपंच अनुराग सरोजकर,ग्रामसेविका एस.एच.पझारे,अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत सदस्य आणि गावातील अनेक ग्रामस्थित उपस्थित होते.