41.4 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home विदर्भ पुरातुन पतीपत्नीला सुखरुप बाहेर काढले

पुरातुन पतीपत्नीला सुखरुप बाहेर काढले

0
1228

blank

सुरेंद्रकुमार ठवरे/अर्जुनी मोरगाव -तालुक्यात सध्या पावसाचा जोर वाढला असुन पुरपरीस्थिती निर्माण झाली आहे.तालुक्यात सर्वत्र पाणीचपाणी दिसत आहे.अशातच अर्जुनी मोरगाव तालुक्यातील विहिरगाव बर्ड्या येथील यशवंत पांडुरंग कोसरे व त्याची पत्नी आशा यशवंत कोसरे हे आज 20 जुलैला सकाळी 10 वाजताच्या सुमारास गावाजवळील येरंडी / देवी येथील स्वत:च्या शेतशिवारात कामानिमित्त गेले होते.19 जुलै रोजीच्या दिवसरात्र मुसळधार पावसाने अचानक पुरस्थीती निर्माण झाल्याने दोन्ही पतीपत्नी शेतामधेच पुरात अडकले.याबाबत स्थानिक लोकांना माहीती होताच लगेच महशुल प्रशासनाच्या आपत्ती विभागाला कळविण्यात आले.परीस्थीतीचे गांभीर्य लक्षात घेता अर्जुनी मोर. चे तहसिलदार अनिरुद्ध कांबळे तथा पोलीस निरीक्षक सोनटक्के हे त्वरीत घटनास्थळी पोहचले.प्रशासन व स्थानीक ढिवर बांधवांच्या मदतीने दोघाही पती पत्नीला सुखरूप बाहेर काढले.

blank