31.2 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ अतिवृष्टीमुळे माहुरकुडा येथे घरांची पडझड

अतिवृष्टीमुळे माहुरकुडा येथे घरांची पडझड

0
286

blank

पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची किशोर तागडे यांची मागणी
अर्जुनी मोर.-तालुक्यात गेल्या चार पाच दिवसापासुन मुसळधार पाऊस पडत आहे.नदी नाले ओसंडुन वहात आहे.तालुक्यातील अनेक मार्ग बंद असल्याने तालुकास्तरीय संपर्क तुटलेला आहे.अशातच माहुरकुडा परिसरात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झाली असुन अनेक घरे क्षतिग्रस्त झाली आहेत.पडझड झालेल्या घरांचे त्वरीत पंचनामे करून शासनाने नुकसान भरपाई देण्याची मागणी अर्जुनी मोरगाव तालुका वंचीत बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष किशोर तागडे यांनी केली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार अर्जुनी मोरगाव तालुक्यात सर्वत्र अतिवृष्टी होत आहे.त्यामुळे माहुरकुडा येथे मोठ्या प्रमाणात घरांची पडझड सुरु आहे.आज ता.22 रोजी माहुरकुडा येथील मोतीराम कवळु मेश्राम, सचिन उईके, गंगाबाई रतिराम कांबळे,बिसन गोसु राऊत,यांची घरे पडली आहेत.तर अनेक घरांची पडझड सुरु आहे. ऐन अतीवृष्टीमधे घरांची पडझड होत असल्याने नागरींकामधे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

blank