गोंदिया,दि.२५ः गोंदिया जिल्ह्यात गेल्या तीन चार दिवसापासून सातत्याने येत असलेल्या पावसामुळे अनेक तालुक्यात अतिवृष्टीची नोंंद झालेली आहे.या अतिवृष्टीमुळे शेतातील पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.सोबतच घऱांचेही पडझड झाल्याने अतिवृष्टीने बाधित झालेल्या नुकसानग्रस्तांना तातडीने मदत देण्यात यावे,या मागणीचे निवेदन मुख्यमंत्र्यांच्या नावे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी(अजित गट)च्यावतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या नेतृत्त्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिष्टमंडळाच्या मुख्यमंत्री या पाठवलेल्या निवेदनात गोंदिया जिल्हयातील धान,मक्का, भाजीपाला, फळबागे तसेच गाव खेडयामध्ये मोठया प्रमाणावर मातीचे घरे व गुरांचे गोठे यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन किवा पंचनामे न करता सरसकट तातडीने जास्तीत जात शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी असे म्हटले आहे.जिल्हयातील अनेक शेतकरी नगदी पिके म्हणन भाजीपाल्याची लागवड सुध्दा केलेली आहे. परंतु काही दिवासापासून सातत्याने अतिवृष्टी होत असल्याने धान, भाजीपाला व अन्य नगदी पिकांचे अतोनात नुकसान झालेले असुन शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला आहे. त्यामुळे अतिवृष्टीमुळे झालेल्या सर्व नुकसानीचे पंचनामे न करता तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी. सोबतच अतिवृष्टीमुळे रोड, रस्त्यांची खराबी झालेली असल्याने तातडीने डागडुगी कऱण्यात यावी तसेच भविष्यात निर्माण होणाऱ्या आरोग्याच्या समस्यांवर तातडीची उपाययोजना व त्याचे निराकरण करण्यासाठी जिल्हा रुग्णालय व तालुका स्तरावरील ग्रामीण रुग्णालयात नागरिकांच्या आरोग्याकरीता औषधांचा साठा व डास, डेंग्यूची फवारणी इत्यादी औषधी तातडीने उपलब्ध करण्याबाबत विविध मागण्यांचा समावेश आहे. निवेदन देतांना प्रामुख्याने माजी आमदार राजेन्द्र जैन,बाळकृष्ण पटले,केतन तुरकर,नानू मुदलियार,नागो बनसोड,अखिलेश सेठ,सुनील पटले,शैलेश वासनिक,प्रशांत सोनपुरे,रौनक ठाकूर,श्रेयस खोब्रागडे आदी उपस्थित होते.





