अकोला,दि.२५ः- अकोला खामगाव राष्ट्रीय महामार्गावर शेगाव वरून अकोल्याला येत असलेल्या महामंडळाच्या चालत्या शिवशाही बसला आज २५ जुर्ले रोजी दुपारी दोन वाजताच्या दरम्यान आग लागल्याची घटना घडली.या बसमधील ४४ प्रवाशाना धावत्या शिवशाही बसने पेट घेतल्याने जीवावर फार मोठे संकट आले होते.मात्र प्रसंगावधान राखून त्यांनी बसमधून पटपट खाली उतरून आपले जीव वाचविण्याचा प्रयत्न केल्याने एक भयानक दुर्घटना होता होता टळली.
अकोला शहराच्या बाहेर हॉटेल तुषार नजिक ही चालत्या बसणे पेट घेण्याची घटना झाली असून त्यातील प्रवाशी केवळ नशीब बलवत्तर म्हणून बचावले आहेत.आजूबाजूच्या नागरिकांनी वेळेचे भान राखून केलेल्या मदतकर्याने अनेक जीव वाचल्याची घटनास्थळी चर्चा होती.
मागच्या वर्षी अश्याच प्रकारे नागपूर अमरावती दरम्यान प्रवास करीत असलेल्या चालत्या शिवशाही बसने पेट घेतल्याने तिचा जागीच कोळसा झाला होता तर प्रसंगावधान राखून प्रवाशांनी आपले जीव वाचविले होते.ह्या नेहमीच शिवशाही बसेस विषयी आग लागण्याच्या दुर्घटना होत असतानाही त्या प्रवाशांच्या सेवेत का ठेवल्या जात आहेत. अगदी भंगार झालेल्या ह्या बसेस प्रवाशांच्या जीवावर उठलेल्या असतानाही त्या भंगारात का काढल्या जात नाहीत ? हा सर्व सामान्य लोकांचा प्रश्न कोणताही लोकप्रतिनिधी विधिमंडळात उपस्थित करीत नाही.हे पाहून मात्र फारच आश्चर्य वाटते.





