33.9 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ केंद्राच्या ओबीसी यादीत लोधी समाजाला सहभागी करण्याकरीता आयोगाच्या अध्यक्षापुढे झाली सुनावणी

केंद्राच्या ओबीसी यादीत लोधी समाजाला सहभागी करण्याकरीता आयोगाच्या अध्यक्षापुढे झाली सुनावणी

0
149

blank

घटनात्मक हक्कांसाठी 20 वर्षांपासून संघर्ष करणाऱ्या सर्व समाजसेवकांच्या मेहनतीला फळ मिळेल : इंजि राजीव ठकरेले

गोंदिया,दि.२८ः  राज्यातील लोधी, लोधा, लोध जातीला केंद्राच्या ओबीसी प्रवर्गाच्या यादीत समाविष्ठ करण्याच्या मुद्याला घेऊन मुंबईतील सह्याद्री अतिथिगृहात राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांच्या उपस्थितीत सुनावणी पार पडली.या सुनावणीमध्ये जातीच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व राजकीय स्थितीची खरी माहिती मिळावी हा या बैठकीचा उद्देश होता. ज्यामध्ये लोधी-लोधा-लोध जातींना पहिला स्थान देण्यात आले होते. मागासवर्गाच्या सुनावणीत राणी अवंतीबाई संस्था काटोल तर्फे राम खरपूरीया,आलोक संघटना तर्फे आनंदलाल दमाहे व ज्ञानेश्वर दमाहे,लोधी अधिकार जन आंदोलन समिती तर्फे इंजि राजीव ठकरेले तर लोधी महासभा तर्फे राधेश्याम नागपुरे यांनी माहिती सादर केली. सर्व संघटनाच्या प्रमुखांनी मागासवर्ग आयोगाच्या राष्ट्रीय अध्यक्षांना जातीचे शैक्षणिक, सामाजिक आर्थिक व राजनीतिक स्तर हे दुबळ असून समाजाला प्रतिदिनिधित्वाची आवश्यकता आहे म्हणून आम्हाला केंद्राच्या ओबीसीच्या सुचित यादीत समाविष्ट करावे अशी विनंती करीत माहिती दिली.

राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष झाल्यानंतर हंसराज अहिर यांनी दि. 26 जुलै रोजी दुसऱ्यांदा सुनावणी बोलावली होती. या आधी दिनांक 17/10/2023 रोजी दिल्ली येथे सुनावणी करण्यात आली होती. लोधी समाज मागासवर्ग आयोगाकडे मोठ्या अपेक्षेने पाहत आहे.कारण महाराष्ट्रातील विदर्भात लोधी लोधा लोध जात मोठ्या प्रमाणात आहे आणि यावेळी विदर्भाचे चंद्रपूर लोकसभेचे प्रतिनिधित्व करणारे हंसराज अहिर हे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष आहेत, त्यामुळे त्यांच्या अपेक्षा आणखी वाढल्या आहेत. लोधी समाजाचा 2004 मध्ये राज्यातील ओबीसी यादीत समावेश करण्यात आला होता. त्यानंतर 20 वर्षे झाली आहेत परंतु तरीही केंद्राच्या ओबीसी यादीपासून वंचित ठेवले जात आहे.कोणत्याही समाजासाठी हा खूप मोठा काळ आहे. तर लोधी समाज देशातील 16 राज्यांमध्ये राहतो, ज्यामध्ये 13 राज्यांमध्ये राज्य आणि केंद्र सरकारच्या OBC च्या यादीत समावेश आहे. आणि 2 राज्यांमध्ये अनुसूचित जमातीच्या यादीत समाविष्ट आहे, फक्त महाराष्ट्राचा राज्य आहे की ज्याला राज्याच्या ओबीसीच्या यादीत समाविष्ट करण्यात आलेला आहे परंतु केंद्राच्या ओबीसीच्या यादीत समाविष्ट केलेला नाही.
राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या सुनावणीला लोधी जातीच्या प्रतिनिधी म्हणून राम खरपुरिया, अनंतलाल दमाहे , ज्ञानेश्वर दमाहे, इंजि राजीव ठकरेले, राधेश्याम नागपुरे, दत्तुसिंग लोधी धुळे, एकनाथ खजुरीया, मोरेश्वर मुटकुरे, श्रीराम बासेवार, नानेश्वर बिरनवारे,मयुर मुरोडीया इत्यादि समाज कर्ते उपस्थित होते.

blank