
गोंदिया,दि.२७ःःमहाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई, महाराष्ट्र शासन जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक जिल्हा रूग्णालय, गोंदिया द्वारा एम.जी. पॅरामेडिकल काॅलेजमध्ये जिल्हास्तरिय रेड रन मॅरेथाॅन व आॅनलाईन प्रष्नमंजुषा स्पर्धा 2024 चे आयोजन दि. 26 जुर्लेला करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा सामान्य रूग्णालय गोंदिया यंाच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रामुख्याने जिल्हा सामान्य रूग्णालय गोंदियाचे संजय जेनेकर जिल्हा पर्यवेक्षक,प्रकाश बोपचे,रवी बघेले,भारत मोहबंशी,दिग्वेष ब्राम्हणकर,प्रवीण इंदूरकर व एम.जी. पॅरामेडिकल काॅलेजचे संचालक अनिल गोंडाने उपस्थित होते.
जिल्हा शल्यचिकित्सकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतानां विषाणू बद्दल माहिती व त्यावरील प्रतिबंधक उपाय सुचविले. आॅनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये प्रितेश मुन्ना टेंभरे प्रथम,आदित्य मनोहर मसराम द्वितीय व राजेश ओमकार सराटे तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला. तसेच रेड रन मॅरेथाॅनमध्ये मुलींच्या गटात निकीता राजेश आंबेडारे ही प्रथम, गीता चंद्रभान गहाने द्वितीय व कैरण सुनिल पटले ही तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली. तसेच मुलांच्या गटात आदित्य मनोहर मसराम हा प्रथम, राजेश ओमकार सराटे द्वितीय व मनीश लालचंद गौतम हा तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला.
कार्यक्रमाला यशस्विरित्या संपन्न करण्यासाठी प्राचार्य अनुसया लिल्हारे, प्रा. प्रीती वैद्य, प्रा. ललीतकुमार डबले, प्रा. रामेष्वरी पटले प्रा. छाया राणा, प्रा. आरती राऊत, प्रा. मनीश चैधरी, प्रा. दुर्गा ठाकरे,राजु रहांगडाले,सौरभ बघेले,राजाभाऊ उंदिरवाडे,योगेष्वरी ठवरे व रूपाली धमगाये तसेच काॅलेजचे विद्यार्थीयांनी सहकार्य केले.कार्यक्रमाचे संचालन कुं. स्वाती खोटेले (डिएमएलटी द्वितीय वर्ष) व आभार प्राचार्य अनुसया लिल्हारे यांनी मानले.




