अर्जुनी मोर. –गोंदिया जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा सभापती शिक्षण व क्रीडा व आरोग्य समिती इंजि. यशवंत गणवीर यांचे सौजन्याने अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गोठणगाव येथे अंगणवाडी इमारतीचे लोकार्पण, साहित्य वाटप तथा गोठणगाव जिल्हा परिषद क्षेत्रा अंतर्गत येणाऱ्या सरपंच व अन्य मान्यवरांचा सत्कार सोहळा व भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन चार ऑगस्ट 2024 रोज रविवारला दुपारी एक वाजता दुर्गा चौक बिरसा मुंडा स्मारका जवळ गोठणगाव येथे आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी या विभागाचे आमदार मनोहरराव चंद्रिकापुरे राहणार आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव तथा माजी आमदार राजेंद्र जैन यांचे हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. स्वागताध्यक्ष म्हणून गोंदिया जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंजी. यशवंत गणवीर तर विशेष अतिथी म्हणून पंचायत समिती सदस्य आम्रपालीताई डोंगरवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष लोकपाल गहाणे, राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष किशोर तरोणे, योगेश नाकाडे, सुशीलाताई हलमारे, किशोर ब्राह्मणकर, हर्षा राऊत, संजय ईश्वार, कांतीलाल डोंगरवार, रवींद्र घरतकर, रघुनाथ मेश्राम, दीपक राणे, रतिराम कोडापे, मनोज रामटेके, कविता परतेकी, पूनम साखरे ,सुनंदा काटेंगे, रीना राणे,तर प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून अंगणवाडी इमारतीचे लोकार्पण तथा तिरडी व शवशितपेटीचे वाटप करण्यात येणार आहे, तसेच गोठणगाव जिल्हा परिषद क्षेत्रांतर्गत येणाऱ्या संपूर्ण गावातील सरपंच व अन्य पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन, आयोजक गोंदिया जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष तथा सभापती शिक्षण व क्रीडा व आरोग्य समिती इंजि. यशवंत गणवीर व मित्र परिवाराने केले आहे.





