24.5 C
Gondiā
Wednesday, August 12, 2026
Home विदर्भ पालकमंत्र्याची हुकूमशाही,डीपीडीसी सदस्यांना बोलण्यास मनाई अग्रवालांनी केला सभात्याग

पालकमंत्र्याची हुकूमशाही,डीपीडीसी सदस्यांना बोलण्यास मनाई अग्रवालांनी केला सभात्याग

0
1686
गोंदिया,दि.१४ः गोंंदिया जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या सभेत पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी समितीचे विशेष निमंत्रित सदस्य गोपालदास अग्रवाल यांना बोलण्यास मनाई केल्याने सभेचे वातावरण काही काळाकरीता तणावपुर्ण झाले होते.समिती अध्यक्ष असलेल्या पालकमंत्र्याच्या या भूमिकेचा निषेध नोंदवत  माजी आमदार व विशेष निमंत्रित सदस्य गोपालदास अग्रवाल यांनी सभात्याग केला.विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व खासदार प्रफुल पटेल यांची या सभेला विशेष उपस्थितीत होती.त्यामुळे राष्ट्रवादीची ही खेळी तर नसावी ना अशा राजकीय चर्चांणा उधाण आले आहे. विशेष म्हणजे जिल्हा नियोजन समितीच्या सभेत सदस्याला प्रश्न उपस्थित करण्यापासून रोखण्याची गोंदिया जिल्ह्यातील इतिहासातील ही पहिलीच घटना राष्ट्रवादी काँग्रेसचे पालकमंत्री असलेल्या अध्यक्षांच्या काळात घडली.
blank
माजी आमदार अग्रवाल यांनी आपले काही प्रश्न उपस्थित करुन प्रश्नाचे समाधान करण्याची विनंती केली,मात्र पालकमंत्री आत्राम यांनी समाधान करण्याएैवजी त्यांना बोलण्यासच मनाई केली.त्यामुळे अग्रवाल यांनी पालकमंत्रीच सदस्यांचे प्रश्न थांबवत असतील तर समस्यांचे समाधान कसे होणार असे म्हणत सभात्याग करीत बाहेर निघाले.
blank