40.6 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home विदर्भ मानवता विद्यालय बोंडगाव/देवी येथे मतदान जनजागृती

मानवता विद्यालय बोंडगाव/देवी येथे मतदान जनजागृती

0
88

blank

गोंदिया, दि.23 : लोकशाही बळकट करण्याकरीता मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी 23 ऑक्टोबर 2024 रोजी  मानवता विद्यालय बोंडगाव/देवी येथे मतदान जनजागृती उपक्रम राबविण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी पालकांकडून ‘आम्ही मतदान करणार’ असे संकल्प पत्र भरुन सादर केले. यावेळी स्वीप नोडल अधिकारी स्वाती तायडे व त्यांचा स्टाफ आशिष कावळे, श्री कापगते, नयन शहारे, सुरेश बोरीकर उपस्थित होते.

देवरी येथे आठवडी बाजारात मतदान जनजागृती

 विधानसभा क्षेत्र 66-आमगाव अंतर्गत पंचायत समिती देवरी येथे आठवडी बाजाराचे औचित्य साधून 22 ऑक्टोबर 2024 रोजी चिचगड रोडवर ग्रामीण रुग्णालयासमोर बाजारात असलेल्या सर्व नागरिकांना मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी व मतदान करण्यासाठी जाणीव जागृती करण्यात आली. यावेळी देवरी येथील स्वीपचे अधिकारी शिक्षण विस्तार अधिकारी हरपाल राऊत, मुख्याध्यापक गभने व पटले तसेच मनोहरभाई पटेल महाविद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक वृंद यांच्या कलापथकाच्या माध्यमातून मतदारांची जाणीव जागृती केली व मतदानाची शपथ देण्यात आली.

blank