40 C
Gondiā
Wednesday, June 17, 2026
Home राजकीय महायुतीने कष्टकऱ्यांच्या उन्नतीसह शेतकऱ्यांना बळ देण्याचे काम केले:- राजेंद्र जैन

महायुतीने कष्टकऱ्यांच्या उन्नतीसह शेतकऱ्यांना बळ देण्याचे काम केले:- राजेंद्र जैन

0
44

अर्जुनी मोर.कष्टकऱ्यांच्या उन्नतीसाठी, शेतकऱ्यांना पाठबळ देण्यासाठी महायुती सरकारनी अनेक योजना राबविल्या. राज्याला प्रगतीच्या मार्गावर नेले. विकासाचा हाच रथ पुढे नेण्यासाठी व अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राच्या सर्वांगीण प्रगतीसाठी महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार राजकुमार बडोले यांना साथ देण्याचे आवाहन माजी आमदार राजेंद्र जैन यांनी केले.
अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदार संघाचे महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार राजकुमार बडोले यांच्या निवडणूक प्रचारार्थ सोमवार तारीख 4 गोरेगाव तालुक्यात ठीक ठिकाणी सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते सभेला संबोधित करीत होते. याप्रसंगी उमेदवार राजकुमार बडोले, राष्ट्रवादीचे यशवंत गणवीर, लोकपाल गहाणे, किशोर तरोणे, अविनाश काशिवार, हर्ष मोदी, लायकराम भेंडारकर, ममता भैय्या व महायुतीतील मित्र पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. माजी आमदार राजेंद्र जैन म्हणाले की खासदार प्रफुल पटेल यांच्याकडे गोंदिया भंडारा जिल्ह्याच्या विकासाची दूरदृष्टी आहे. जिल्ह्यात उद्योगाची स्थापना करून स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी त्यांची धडपड आहे. तर महायुती सरकारने सर्वसामान्यांना केंद्रस्थानी ठेवून त्यांच्यासाठी विविध विकासात्मक योजना राबवील्या लाडकी बहीण, किसान सन्मान,वयोश्री यासारख्या योजनातून महायुती सरकारने सर्वसामान्यांना बळ देण्याचे काम केले. या क्षेत्राच्या विकासासाठी व खासदार प्रफुल पटेल यांचे हात बळकट करण्यासाठी महायुतीचे उमेदवार राजकुमार बडोले यांना मतरुपी आशीर्वाद देऊन त्यांना साथ देण्याचे आवाहन केले. यावेळी उपस्थित महायुतीच्या नेत्यांनी सुद्धा राजकुमार बडोले यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याचे आवाहन केले. रोजगार व सिंचन निर्मितीवर भर देणार:- राजकुमार बडोले
अर्जुनी मोरगाव मतदार संघात उद्योगधंद्याची स्थापना करून त्यातून रोजगाराच्या संधी निर्माण करून देणे आणि अधिका अधिक क्षेत्र सिंचनाखाली आणणे यावरच आपला सदैव भर राहिला आहे. यापुढेही या मतदार संघात धानावर प्रक्रिया उद्योग व तसेच इतर उद्योगांची स्थापना करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करणार असल्याचे महायुतीचे उमेदवार राजकुमार बडोले यांनी सांगितले.