
सुनील तरोणे व मित्र परिवाराचा अनोखा उपक्रम;
सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी
नवेगावबांध दि.8 .सुनील तरोणे व मित्र परिवाराच्या वतीने अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सावरटोला येथे नवविवाहित लेकींसह जावयांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.दिवाळीनिमित्त सासरवाडीत झालेल्या सन्मान, सत्काराने जावई भारावून गेले होते. लेकींच्या डोळ्यांतही आनंदाश्रू वाहले.शनिवार, २ नोव्हेंबर रोजी रात्री ८.३० वाजता हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमांचे व महिलांनी रंगमंचित केलेल्या नाटकाचेही आयोजनही करण्यात आले होते.
दरवर्षी लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी गोवर्धन पूजेच्या दिवशी सावरटोला येथे हा कार्यक्रम नियमितपणे आयोजित केला जातो.कार्यक्रमाचे उद्घाटन पुणे येथील थेरपिस्ट काउन्सिलिंग, गाठी भेटी संस्थेच्या नाट्य कलावंत श्रुती उत्तुरकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.पुण्याचे भारत नाट्य संशोधन मंदिराचे संस्थापक राजेंद्र उत्तुरकर हे अध्यक्षस्थानी होते.पाहुणे म्हणून यावेळी अर्जुनी मोरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुशील नलावडे,सरपंच युवराज तरोणे, पोलिस पाटील शंकर तरोणे, सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष योगेश लाडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय राऊत,पत्रकार रामदास बोरकर,संजीव बडोले,माजी सरपंच भीमराव रामटेके,सामाजिक कार्यकर्त्या शालुबाई कोल्हे, भारतीय सैनिक सचिन शिवणकर, सरपंच कुरुंदाताई वैद्य, राकेश डोये,खुशाल डोंगरवार,यादवराव तरोणे, पांडुरंग भोपे, मनोहर तरोणे,राजेंद्र तरोणे, गोवर्धन मुनेश्वर, वनरक्षक दुधराम तरोणे,नेपाल राऊत, उमरीचे पोलिस पाटील संदीप तरोणे उपस्थित होते.गावात यावर्षी आठ लग्न झाले. त्यापैकी सात जावई व लेकी या कार्यक्रमात उपस्थित होते.सर्व जावयांचा परिचय झाल्यानंतर जावयांना शाल, श्रीफळ तसेच मुलींना साडीचोळी व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.
यांचा झाला सन्मान
सावरटोला येथील मंगलाबाई वलथरे यांची मुलगी वैष्णवीताई,जावई राजेंद्र मांढरे पुतळी,सुल्काबाई मेश्राम यांची मुलगी निशाताई,जावई गणेश मेश्राम खंडाळा, मंदाबाई मेश्राम यांची मुलगी किरणताई, जावई कृष्णा गेडाम येनोडी,हेमराज तरोणे यांची मुलगी यामीनाताई,जावई संदिप भेंडारकर मानेगाव,प्रभुजी ब्राम्हणकर यांची मुलगी आचलताई,सौरभ काळे पवनी, शंकर तरोणे यांची मुलगी अश्वीनी, जावई जयप्रकाश थेर मरेगाव,गणपतजी हेमणे यांची मुलगी संगिता, जावई चेतन मटाले साकोली यांचा भावपूर्ण सन्मान यावेळी करण्यात आला.
प्रारंभी सुवासिनी महिला वच्छलाबाई मुनेश्वर शोभाबाई कठाणे पल्लवीताई तरुणे जिजाबाई कठाणे प्रमिलाबाई तरोणे उर्मिलाबाई बारसागडे वैशालीबाई राकडे यांनी जावई व लेखींचे आरती ओवाळून औक्षण केले.
कार्यक्रमाला उपसरपंच सुवर्णा तरोणे,तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्ष सरिता मेश्राम, ग्रामपंचायत सदस्य धर्मेंद्र गजबे, दिलीप मेश्राम,कविता चचाने,उर्मिला शिवणकर, महादेव डोये,प्रकाश शिवणकर, डॅनी डोये यांच्यासह गावकरी उपस्थित होते.प्रास्ताविक रामेश्वर राऊत यांनी मांडले,तर बहारदार संचालन सुनील तरोणे यांनी केले. उपस्थितांचे आभार रवीकुमार मेश्राम यांनी मानले. कार्यक्रमाला ग्रामवासी महिला-पुरुष,आबाल- वृद्ध बहुसंख्येने उपस्थित होते