तब्बल दोन दशकानंतर राजकीय वैर विसरून गडकरी गेले शिवणकरांच्या भेटीला

0
1153

गोंदिया,दि.०८ः- निवडणुकीच्या ताेंडावर राजकीय वैर विसरत विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराकरीता आलेले केंंद्रिय रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते माजी खासदार व राज्याचे माजी अर्थमंत्री प्रा.महादेवराव शिवणकर यांची आज त्यांच्या आमगाव येथील निवासस्थानी त्यांची भेट घेतली.त्यांची आस्थेने विचारपूस करीत हात जोडत नमस्कार घेतले.गडकरी हे जवळपास १५-२० वर्षानंतर शिवणकर यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्याशी बोलले.गडकरी हे आमगाव विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार यांच्या प्रचाराकरीता आमगावच्या बाजार समिती प्रागंणात आले असता,त्या आधी त्यांनी प्रा.शिवणकर यांच्या घऱी जाऊन भेट घेतली.गेल्या तीन चार वर्षापासून प्रा.शिवणकर यांची प्रकृती अस्वस्थ असल्याने ते आजारी आहेत.त्यांना आजारपणात कुठलीच हालचाल करता येत नसल्याने गडकरी यांनी त्यांच्या घरी जाऊन हातजोडत आस्थेने विचारपूस केली.यावेळी त्यांच्यासोबत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजय शिवणकर,माजी आमदार केशवराव मानकर आदी मान्यवर उपस्थित होते.