24.4 C
Gondiā
Wednesday, August 19, 2026
Home राजकीय निकालाआधीच बच्चू कडू यांचा मोठा दावा;“आमचं सरकार येईल”

निकालाआधीच बच्चू कडू यांचा मोठा दावा;“आमचं सरकार येईल”

0
336

विधानसभेच्या निकालाआधीच आमदार बच्चू कडू यांनीही सरकार स्थापनेबाबात मोठा दावा केला आहे. “आमचं सरकार येईल. अपक्ष आणि छोट्या पक्षांचं सरकार बनेल आणि मोठ्या पक्षांचा बाहेरून पाठिंबा आम्ही घेऊ”, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. ते एबीपी माझा या वृत्तवाहीनीशी बोलत होते.

“सरकारच आमचं येईल. अपक्ष आणि छोट्या पक्षांचं सरकार बनेल. मोठ्या पक्षांचा बाहेरून पाठिंबा आम्ही घेऊ. तशा पद्धतीची चर्चा सुरु आहे. आमच्याशिवाय कोणतंही सरकार सत्तेत येणार नाही. महाविकास आघाडीला किंवा महायुतीला पाठिंबा देण्यापेक्षा आपणच सरकार बनवू आणि त्यांचा बाहेरून पाठिंबा घेऊ, असा दावा बच्चू कडू यांनी केला आहे. तसेच एक्झिट पोलच्या अंदाजानुसार कोणत्याही पक्षाचं किंवा आघाडी आणि युतीच्या जागाचा आकडा बहुमतापर्यंत जात शकत नाही असं दिसत आहे. त्यामुळे आम्ही असल्याशिवाय सत्ता येऊ शकत नाही, असंही बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

“जवळपास एक महिना निवडणुकीच्या धावपळीत गेला. आम्ही १२ ही महिने काम करत असतो. मात्र, लोकांच्या कामांसाठी पळणं आणि निवडणुकीसाठी काम करणं वेगळं असतं. आम्ही या मतदारसंघात नक्की निवडून येऊ असा विश्वास आहे. मात्र, आम्हाला दोन्हीही राष्ट्रीय पक्ष पाडण्यासाठी प्रयत्न करत होते. ते जिंकण्यासाठी प्रयत्न करत नव्हते. त्यांच्यामध्ये मोठा संभ्रम होता. दुसरं म्हणजे महाराष्ट्रात १२२ पैकी महाशक्तीच्या २५ ते ३० जागा टॉप लढतीत आहेत. त्यामध्ये आमच्या १० जागा कोणत्याही परिस्थितीत निवडून येऊ शकतात अशी परिस्थिती आहे”, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.