24.1 C
Gondiā
Sunday, August 16, 2026
Home गुन्हेवार्ता मोटारसायकल चोरट्याकंडून चोरीच्या 11 मोटर सायकली हस्तगत

मोटारसायकल चोरट्याकंडून चोरीच्या 11 मोटर सायकली हस्तगत

0
265

गोंदिया,दि.०९ः– गोंदिया पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात दाखल मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्यातील गुन्हेगारांचा व चोरीच्या मोटार सायकलचा शोध घेत असताना येथील मामा चौक रहिवासी यश गुप्ता याच्याकडे चोरीच्या मोटार सायकली असून विक्री करणार असल्याची माहिती मिळाली.त्या आधारे पथकाने मोटार सायकल चोरी करून विक्री करणारा यश रमेश गुप्ता वय- 20,रा. मामा चौक गोंदिया यास त्यांचेकडे असलेल्या चोरीच्या मोटार सायकलसह ताब्यात घेत चौकशी केली असता त्यांने लोकेश मानिकचंद रिनाईत वय-21,रा.खापर्डे कॉलोनी गोंदिया,व राहुल उर्फ चंगा सुपचंद लिल्हारे वय 23,रा.अंगुर बगीचा गोंदिया यांनी मोटारसायकल आणून दिल्याची माहिती दिली.त्या माहितीच्या आधारे आरोपी क्रं 2 व 3 यांना नागपूर येथून ताब्यात घेण्यात आले.

आरोपी क्रं 1 व 2, 3 यांनी पो.ठाणे रामनगर, रावणवाडी, गोंदिया शहर हद्दीतून तसेच भंडारा व नागपूर जिल्ह्यातून मोटार सायकल चोरी करून आणल्याचे निष्पन्न झाल्याने तिन्ही आरोपीच्या ताब्यातून गोंदिया जिल्हयातील पोलीस ठाणे रामनगर, रावणवाडी, गोंदिया शहर येथील दाखल गुन्ह्यातील तसेच जिल्हा भंडारा व नागपूर जिल्ह्यातून चोरी केलेल्या एकूण 11 नग चोरीच्या मोटर सायकली किमती 8 लक्ष 35,000/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून गुन्ह्यांत जप्त करण्यात आले.तसेच आरोपी व गुन्ह्यात जप्त चोरीच्या 11 मो. सा. मुद्देमाल पो. ठाणे रामनगर पोलीस यांच्या ताब्यात देण्यात आले असून रामनगर पोलीस पुढील कारवाई करीत आहेत.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक गोंदिया गोरख भामरे, अपर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा, यांचे आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक स्थागुशा दिनेश लबडे, यांचे मार्गदर्शनात पो. हवा. प्रकाश गायधने, दुर्गेश तिवारी, इंद्रजित बिसेन, सुबोध बिसेन, चापोशी राम खंदारे, मुरली पांडे यांनी केलेली आहे.