23.8 C
Gondiā
Sunday, August 16, 2026
Home गुन्हेवार्ता मद्यप्राशन करून शाळेत गोंधळ घालणाऱ्या शिक्षकाविरुध्द गुन्हा दाखल

मद्यप्राशन करून शाळेत गोंधळ घालणाऱ्या शिक्षकाविरुध्द गुन्हा दाखल

0
1411
गोंदिया,दि.०९ः-  जिल्ह्यातील आमगाव पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या पदमपुर जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत दारु पिऊन धिंगाणा घालणार्या शिक्षकाविरुध्द आमगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्याने एकच खळबळ शिक्षण क्षेत्रात माजली आहे.शनिवार ७ डिसेंबरला सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास पदवीधर शिक्षक काशीराम दुलीराम चौरागडे यांनी शाळेत दारुच्या नशेत धिंगाणा घातल्याचे चित्र विद्यार्थ्यासंह इतर शिक्षकांना प्रत्यक्ष बघावयास मिळाले.
सदर शिक्षक चौरागडे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न मुख्याध्यापिकेसह इतर शिक्षकांनी केले,परंतु नशेल असलेल्या शिक्षकाला आपण काय करतोय याचे भानच उरलेले नव्हते.त्यामुळे अखेर..त्रासलेल्या महिला मुख्याध्यापिकेने आमगाव पोलिसांना माहिती दिली,त्यावरुन आमगाव पोलिसांनी शिक्षकाविरुध्द कलम ८५(१)मदका अन्वये गुन्हा नोंदविला असून पुढील तपास पोलीस हवालदार उईके हे करीत आहेत.