सडक/अर्जुनी तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घर वापसी

0
116

सडक/अर्जुनी,दि.११ः तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय गोंदिया येथे माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या हस्ते दुपट्टा वापरून घर वापसी केली. माजी सरपंच दिनेश कोरे यांची काही दिवसापूर्वीच पक्षात घर वापसी केली होती.नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीतील प्रचंड यशानंतर खासदार प्रफुलभाई पटेल यांच्या कार्यक्षम व खंबीर नेतृत्वात क्षेत्राचा सर्वांगीण विकास व प्रगती होणार यावर विश्वास ठेवून यावेळी सडक/अर्जुनी तालुक्यातील घनश्याम गजभिये, सचिन यसनसुरे, भुवन भोयर, उमराव मांढरे, नीतेश खोटेले, सचिन जयराम, गुलाब तोड़फोड़े, नीरज मेश्राम, नेतराम ब्राम्हणकर, सुनील रहिले, गुड्डू मरस्कोल्हे, महेंद्र हेमने, माणिक वाढई, किशन अम्बुले, संतोष लामकासे, राजेश कठाने, खेमचंद खोटेले, नीलेश ब्राम्हणकर, राजेश राहंगडाले, चोपराम भालेकर, उमराव मांढरे, विनोद काम्बले, श्यामराव कळोन्हवे, पतिराम मंढारी, कृष्ना दलाल, घनश्याम कापगते, उज्वलाताई हटवार, माधो हटवार, मनीष मुनेश्वर, अंकुश गजभिए, भुवन भोयर, शेषराव मेश्राम, नीलेश ठलाल, प्रमोद लांजेवार, सुनील चाफले, नरेश साखरे, राहुल मोटूले, सुरेश तुमदाम, प्रदीप काम्बले, होमराज दखने, अजय ठलाल सह अनेक कार्यकर्त्यांनी घर वापसी केली या घर वापसीमुळे पक्षाला बळकटी येणार असून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

यावेळी राजेन्द्र जैन, अशोक सहारे, दिनेश कोरे, राजू एन जैन, केतन तुरकर, किशोर तरोने, डी. यू. राहंगडाले, अखिलेश सेठ, रविकुमार (बंटी)पटले, नीरज उपवंशी, शैलेश वासनिक व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.