नागपूर,दि.११ः-राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय बजाज नगर, नागपूर येथे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी समन्वय बैठक माजी आमदार तथा नागपूर जिल्हा निरीक्षक राजेंद्र जैन व जिल्हाध्यक्ष शिवराज (बाबा ) गुजर यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली.१५ डिसेंबरला डॉ. वसंतराव देशपांडे सभागृह, सिव्हिल लाईन्स येथे नुकताच विधानसभा निवडणुकीत मोठया मताधिक्याने निवडून येत राज्यात महायुतीची सरकार स्थापन करणार आली. त्यानिमित्ताने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व नव निर्वाचित आमदारांचा सत्कार कार्यक्रम व विदर्भस्तरीय भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे. राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा खासदार प्रफुल पटेल व प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे. या कार्यक्रमाला जिल्ह्यातून जास्तीत जास्त संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहिले पाहिजे या अनुषंगाने सर्व पदाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या.
बैठकीला सर्वश्री राजेंद्र जैन, शिवराज (बाबा) गुजर, प्रशांत पवार, देवेंद्रनाथ चौबे, सचिन चव्हाण, नरेश अरसडे, करिष्मा चुटे, नितेश फुलेकर, सुधाकर तिबोले, भागवत खंगार, पुंडलिक राऊत, अरविंद अंबागडे, विलास मामुलकर, दिलीप सांगडीकर , शोहेब असद, विरु सिंग, भुजंग भोजनकर, डॉ. चंद्रशेखर समर्थ, आंबीलडूकेजी, अरुण मदनकर, विवेक चिचखेडे, रवी वैद्य, योगेश पर्बत कुलभूषण कळंबे, शुभम ढवळे, राकेश राऊत, विशाल मेटांगळे, प्रफुल्ल महल्ले, पवन वानखेडे, मनोज कराडे, मंदाताई झाडे, पूनम दीदी, कैलास वरेकर, सुनील मैदिले, पुष्कर सिंग सहित विधानसभा अध्यक्ष तालुका अध्यक्ष शहराध्यक्ष महिला विद्यार्थी युवक फ्रंटल सेल प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.