मॉडेल कॉन्व्हेन्ट एन्ड विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय गोरेगांवमध्ये विज्ञान प्रदर्शन

0
15

गोरेगांव :– स्थानीय मॉडेल कॉन्व्हेन्ट एन्ड विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय गोरेगांव मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी संस्था सचिव प्रा. आर. डी. कटरे उपस्थित होते. त्याचबरोबर मुन्नलाल हरिणखेडे माजी उपसरपंच चांदीटोला, शाळेचे प्रशा.अधि.सी. बी. पटले, मुख्याध्यापक सौ. सी. पी.मेश्राम, पर्यवेक्षक कु. एस. डी. चिचामे, प्रमुख अतिथी म्हणून प्रामुख्याने कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात भारताचे वैज्ञानिक डॉ. ए. पी. जे.अब्दुल कलाम, भारताचे भौतिकशास्त्रज्ञ सी. वी. रमण यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आले. कार्यक्रमाला उपस्थित पाहुण्यांचे बॅचेस लाऊन स्वागत करण्यात आले. विज्ञान दिवसाला अनुसरून विद्यार्थ्यांनी अनेक प्रकारचे मॉडेल्स प्रतिकृती तयार करून प्रदर्शित केले. संस्था सचिव प्रा.आर.डी.कटरे तसेच उपस्थित पाहुणे मंडळी यांच्या समोर विद्यार्थ्यांनी बनविलेल्या मॉडेल्स बद्दलची सविस्तर माहिती सादर केली. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना विज्ञान प्रदर्शनी दाखविण्यात आली. विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपल्या सुप्त गुणांना वाव द्यावा, तसेच प्रतिकृतींची दैनंदिन जीवनात उपयोग करण्याच्या दृष्टीने संशोधन करावे. विद्यार्थ्यांमध्ये कुतूहल निर्माण करण्याबरोबरच त्यांच्यातील वैज्ञानिक दृष्टिकोन वाढविण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला उपस्थित प्रा.आर.डी.कटरे तसेच अतिथीकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी रित्या पार पडण्याकरिता शाळेतील सर्व शिक्षक वृंद यांनी सहकार्य केले.