
गोंदिया,दि.२७ःराज्य शासनाच्या गृह खात्याने पोलिस दलातील तब्बल ५०३ सहाय्यक पोलिस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश आज जारी केले असून त्यात जिल्ह्यातील व विभागातील कालावधी पूर्ण झालेल्या सहा.पोलिस निरीक्षकांच्या इतर जिल्ह्यात व विभागात बदल्या करण्यात आल्या आहेत.यामध्ये गोंदिया जिल्ह्यातील १० सहा.पोलिस निरीक्षकांचा समावेश आहे.मात्र त्यांच्या जागी एकही सहा.पोलिस निरिक्षक देण्यात आलेले नाही.