29.7 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ मोक्षधाम नवेझरी येथे बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरूच

मोक्षधाम नवेझरी येथे बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरूच

0
112

blank

शेतकरी, शेतमजूर, भूमिहीन नागरिकांचा भजन-कीर्तनाद्वारे पाठिंबा
तिरोडा,दि.१२-मोक्षधाम नवेझरी येथे प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र भांडारकर यांच्या नेतृत्वाखाली 10 जून 2025 पासून बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात झाली आहे. विविध सामाजिक आणि आर्थिक प्रश्नांवर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन सुरू करण्यात आले असून आंदोलनाचा तिसरा दिवस आहे.

11 जून रोजी रात्री 10.30 वाजता सोनेखारी, खैरी, सीतेपार, मुरमाडी, कुल्पा, लोणारा आणि खेडेपार येथून आलेले शेतकरी, शेतमजूर आणि भूमिहीन नागरिकांनी आंदोलनस्थळी भेट देत महेंद्रभाऊ यांची विचारपूस केली. त्यांनी भजन-कीर्तन गाऊन आंदोलनाला आपला पवित्र व सांस्कृतिक पाठिंबा दर्शविला.

या आंदोलनाला आता फक्त राजकीय नव्हे तर सामाजिक आंदोलनाचे स्वरूप येत असून, गावकऱ्यांचा दिवसेंदिवस वाढता पाठिंबा हेच आंदोलनाच्या व्यापक परिणामाचे द्योतक आहे. इतरही गावांमधून नागरिक आंदोलनस्थळी येत असून प्रशासनाने लवकरात लवकर याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी उपस्थित नागरिकांनी केली.प्रहार पक्षाचे कार्यकर्ते, सहकारी व स्थानिक जनता आंदोलनकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी असून, हे आंदोलन मागण्या पूर्ण होईपर्यंत सुरूच राहणार असल्याचा पुनरुच्चार महेंद्र भांडारकर यांनी केला.

blank