सुनील तटकरे यांच्या भाचेसून अपर्णा महाडिकसह 4 मराठमोळ्या क्रू मेंबर्सचा मृत्यू

0
476

या अपघातात विमानातील (Airplane) 242 पैकी 241 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 12 क्रू मेंबर्संनाही आपला जीव गमवावा लागला. त्यामध्ये, महाराष्ट्रातील 4 चार क्रू मेबर्सं होते, विशेष म्हणजे कॅप्टन सुमित पुष्कराज सभ्रवाल यांच्यासह आणखी 3 क्रू मेंबर्स हे महाराष्ट्रातील रहिवाशी होते. त्यामध्ये, सुमित पुष्काराज आणि अर्पण महाडिक हे दोघे मुंबईतील (Mumbai) रहिवाशी आहेत. तर, दीपक पाठक हे बदलापूरचे आणि रोशनी सोनघरे ह्या डोंबिवलीकर आहेत. या दुर्घटनेत 4 मराठमोळ्या क्रू मेंबर्संचा दुर्दैवी अंत झाल्याने कुटुबीयांवर व मित्र परिवारावर शोककळा पसरली आहे. 

चिपळूण तालुक्यातील धामेली (भोजनेवाडी) गावातील सुपुत्रवधू आणि एअर इंडिया या प्रतिष्ठित विमान कंपनीमध्ये क्रू मेंबर म्हणून कार्यरत असलेल्या अपर्णा महाडिक (वय ३५) यांचा आज गुरुवारी अहमदाबादमध्ये झालेल्या विमान दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यांच्या अपघाती मृत्यने धामेली गावावर शोककळा पसरली आहे.

गुजरातच्या अहमदाबादमध्ये आज एक मोठी आणि हृदयद्रावक विमान दुर्घटना घडली आहे. अहमदाबादच्या मेघानीनगर परिसरात एअर इंडियाचे AI-171 हे प्रवासी विमान कोसळले. या विमानात अनेक भारतीय, ब्रिटिश आणि इतर देशांचे नागरिक होते. या भीषण अपघातात सात मराठी लोकही प्रवास करत होते, ज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे यांच्या भाचेसून अपर्णा महाडिक यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे, ज्यामुळे तटकरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

सुनील तटकरेंच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर

एअर इंडियाचे (Air India Crash) AI171 विमान अहमदाबादहून लंडनला जात होते. हे विमान डॉक्टरांच्या वसतिगृहाजवळ कोसळले असून, यात २४२ प्रवासी होते. टेकऑफनंतर काही मिनिटांतच विमान कोसळल्याने ही मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत विमानात असलेल्या सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे, ज्यामुळे ही घटना अत्यंत भीषण ठरली आहे.

अपर्णा महाडिकांचा मृत्यू

विमान प्रवासात महाराष्ट्रातून सुनील तटकरे यांच्या भाचेसून अपर्णा महाडिक या क्रू मेंबर म्हणून होत्या. त्या सुनील तटकरे यांच्या मोठ्या बहिणीच्या सूनबाई आहेत, म्हणजेच त्यांच्या सख्ख्या भाच्याची पत्नी. अपर्णा महाडिक ‘केबिन क्रू’ म्हणून कार्यरत होत्या. सकाळीच त्या अहमदाबादला गेल्या होत्या आणि दुपारच्या या दुर्दैवी विमानात त्या कार्यरत होत्या. अपर्णा यांचे पती देखील एअर इंडियामध्येच आहेत. अपर्णा आणि त्यांचे पती मुंबईतील गोरेगाव येथे राहत होते. त्यांच्या निधनाने महाडिक आणि तटकरे कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

बदलापूरचे दिपक पाठक यांचा दुर्दैवी मृत्यू

एअर इंडियाच्या विमान दुर्घटनेत बदलापुरातील रहिवाशी आणि एअर इंडियाचा क्रू मेंबर दीपक पाठक यांचाही मृत्यू झाला आहे. या अपघाताची माहिती बदलापुरात त्याच्या कुटुंबीयांना आणि त्याच्या मित्र परिवाराला कळताच पाठक यांच्या घरी गर्दी झाली होती. विशेष म्हणजे आज दुपारी विमानात जाण्यापूर्वीच त्याचं आईशी फोनवरून बोलणं झालं होतं. त्यानंतर दीपकशी काही संवाद झालेला नाही. मात्र, आता दीपकचा फोन लागतो, पण तो उचलत नाही, अशी मन हेलावून टाकणारी प्रतिक्रिया त्यांच्या बहिणीने दिली. दीपकचे 4 वर्षांपूर्वीच लग्न झाले होते.

डोंबिवलीच्या रोशनी सोनघरे हिचा मृत्यू

अहमदाबाद येथे झालेल्या भीषण विमान दुर्घटनेत डोंबिवलीकर रहिवाशी कु. रोशनी सोनघरे हिचाही दुर्दैवी मृत्यू झाला. एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानामध्ये रोशनी फ्लाइट क्रू म्हणून कार्यरत होती.

पवईचे सुमित सभ्रवाल

अहमदाबाद दुर्घटनेतील पायलट सुमित सभ्रवाल हे पवईच्या जलवायू विहार इमारतीमध्ये त्यांच्या वडिलांसह राहतात. या दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच येथील स्थानिक आमदार दिलीप लांडे यांनी त्यांच्या घरी जाऊन कुटुंबाचे सांत्वन केले.