43.7 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home विदर्भ खारूल काच नदीला पूर; जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचा घटनास्थळी दौरा

खारूल काच नदीला पूर; जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचा घटनास्थळी दौरा

0
49

blank

वाशिम,दि.२६ जून-आज केनवड परिसरातील पिंपरी सरहद्द येथे खारूल काच नदीला आलेल्या पुरामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या पार्श्वभूमीवर आदरणीय जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रेमकुमार ठोंबरे व जिल्हा साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. मोबिन खान यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आणि आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले.
अधिकार्‍यांनी स्थानिक आरोग्य केंद्राशी समन्वय साधून बाधित भागात पाणीजन्य आजारांचा प्रसार रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश दिले. नागरिकांनी उघड्या पाण्याचा वापर टाळावा, उकळून थंड केलेले पाणीच पिण्याचे आवाहन त्यांनी केले.
आरोग्य विभागामार्फत आवश्यक औषधे, प्राथमिक उपचार साधनसामग्री व आरोग्य पथक तैनात करण्यात आले असून, परिस्थिती नियंत्रणात असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. पूरस्थितीचा आढावा घेत, नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सर्व यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली आहे.

blank